अज्ञात व्यक्ति डॉक्टरला भेटला आणि अचानक केला कोयत्याने वार…

Nashik : सुयोग रुग्णालयाचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर रुग्णालयात कोयत्याने वार केला. अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉ. राठी हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
ही घटना शुक्रवारी (दि. 23) रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पंचवटी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील डॉ. राठी यांचे सुयोग हॉस्पिटल आहे. शुक्रवारी रात्री संशयित आरोपी त्यांना भेटायला आला. यानंतर त्याने डॉ. राठी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा सुरू केली. चर्चेदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.
त्यांनतर संशयित आरोपीने डॉ. राठी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. संशयिताने डॉ. राठी यांच्या डोक्यावर व मानेवर त्याने १५ ते २० वार केले. व तेथून पळ काढला. याची माहिती मिळताच हॉस्पिटलमधील कर्मचारी धावत आले. व त्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले.
मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव , पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. संशयिताने राठी यांच्यावर हल्ला का केला? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765