Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आज ना उद्या केजरीवाल यांनाही अटक होईल… – शरद पवार

Spread the love

आंबेगाव : आज ज्येष्ठ नेते शरद पवार हे आंबेगाव दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी आता राज्यातील पक्षांनीही सुरुवात केल्याचे दिसत आहे.

या सभेमध्ये बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना मोठे वक्तव्य केले आहे. एका राज्याचे मुख्यमंत्री जेलमध्ये जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीमध्ये आता दोन गट पडल्यावर शरद पवार गटाने प्रचाराला सुरूवात केली आहे. अजित पवार गटातील नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवार यांची महासभा झाली.

पंतप्रधान मोदी यांचा आस्था ही पक्ष फोडणे आणि लोकांना तुरुंगात टाकण्यात येत आहे. झारखंड हे आदिवासींचे राज्य आहे, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल चांगले राज्य चालवतात, हे पंतप्रधानांना आवडत नाही, म्हणून त्यांच्या दोन चार मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. केजरीवाल यांना 16 नोटीस पाठवल्या. आज ना उद्या केजरीवाल यांनाही अटक होईल, हे काय चाललंय? असा सवाल करत पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोज एक जाहिरात आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो. मोदीची गॅरंटी, एका बाजूला यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला कोणी ना कोणी शेतकरी आत्महत्या करतोय हे चित्र पाहायला मिळत आहे. ही स्थिती किती दिवस चालू द्यायची. यात बदल करायचा की नाही, ठरवले तर आपण करू शकत असल्याचे पवार यांनी सांगितले.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!