Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

छत्रपती संभाजीनगर येथील अकॅडमीच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या

Spread the love

शहरातील छत्रपती संभाजीनगर वाळूज भागातील बजाजनगरातील येथील गरुडझेप अकॅडमीत पोलीस भरतीच्या तयारी करत सलेल्या १९ वर्षीय तरुणीने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मात्र, वेळेवर पैसे न दिल्याने अकादमीत गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या मुलीला अकॅडमीच्या संचालकाने इतर मुलींसमोर ‘तू काळी आहेस’, असे म्हणत मारहाण करून तिचा अपमान केला.

हा अपमान सहन न झाल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी गरुडझेप करिअर ॲकॅडमीच्या संचालकासह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लीना पाटील (वय १९ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

लीना पाटीलच्या वडिलांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, “त्यांची मुलगी लीना पाटील दीड वर्षांपूर्वी पोलिस आणि लष्करात भरती होऊन सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून बजाजनगर येथील गरुड झेप अकादमीत दाखल झाली होती.”

त्यासाठी त्यांनी तीन टप्प्यांत एकूण 1 लाख 20 हजार रुपये भरले होते. मेससाठी ती महिन्याला ४५०० रुपयेही देत ​​होती. कधीकधी मेसचे पैसे भरण्यासाठी उशीर होत होता. लीना तिच्या वडिलांना फोन करून पैसे देण्यास उशीर झाल्यामुळे नाश्ता दिला नाही असे सांगायची आणि नीलेश सोनवणे सर इतर मुलांसमोर उद्धटपणे वागायचे आणि तिचा अपमान केल्याचे सांगायची. मात्र, निलेश सोनवणे यांनी प्रशिक्षण झाल्यावर नोकरी लावून देण्याची हमी दिल्याने थोडा त्रास होईल असे म्हणून लीनाचे वडील मुलीला धीर द्यायचे,” असे तक्रारीत म्हटले आहे.

इतकं माय बापाचं वाटते तर जीव दे

गरुडझेप ॲकॅडमीचा संचालक नीलेश सोनवणे हा मेसच्या पैशासाठी लीना आणि इतर मुलींना सतत अपमानित करत होता. अनेकदा त्यांना नाश्ता आणि जेवण न दिल्याने त्यांचा अपमान करायचा.

विशेष म्हणजे लीनाला सर्वांच्या समोर ‘ये काळे’ म्हणून हाक मारायचा. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचा नीलाने एकदा थेट निलेश सोनवणेला सांगितले होते. त्यावर, ये काळे तू मला शकवू नको, इतकं माय बापाचं वाटते तर जीव दे.

तुझी लायकी तरी आहे का नोकरीवर लागायची, मी हमी घेतली आहे ना, लावेल तुला नोकरी, नाहीतर तुला काय करायचे ते कर, असे निलेश सोनवणे म्हणाला होता, असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!