Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बॉयफ्रेंडच्या इच्छेखातर तरुणाने केली लिंगबदल शस्त्रक्रिया, आता करत आहे इच्छामरणाची मागणी

Spread the love

मध्य प्रदेश: प्रेमात असलेल्या बॉयफ्रेंडच्या इच्छेखातर एका तरुणाने लिंगबदल करुन मुलगी व्हायचे ठरवले. त्यासाठी काही शस्त्राक्रियाही करुन घेतल्या. मात्र आता प्रियकराने फसवल्यानंतर इच्छामरण द्या अशी मागणी लिंग बदल केलेल्या तरुणीने केली आहे.

लिंगबदल शस्त्रक्रिया ही आता नवीन गोष्ट नाही. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आपण पुरुषाच्या शरीरात स्त्री आहोत म्हणजे आपल्या आवडी-निवडी, भावभावना या स्त्रीसारख्या आहेत या जाणिवेतून एका तरुणाने लिंगबदल शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

त्याच्या प्रियकराने त्याला ही शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले. त्यासाठी अनेक शस्त्रक्रिया करुन घेतल्या. आता तिचे नाव रजनी (नाव बदललं आहे) आहे. शेवटची योनीमार्गासाठीची शस्त्रक्रिया शिल्लक असताना मात्र प्रियकरानेच त्याला सोडून दिलं आहे. त्यामुळे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन मी स्वतःला बदलले, आता मी कोण, स्त्री की पुरुष हे मलाच कळत नाही असे म्हणत इच्छामरण द्या अशी मागणी रजनीने केली आहे.

रजनी म्हणाली, मी दोन तीन वर्षांपूर्वी विभव शुक्ला या तरुणाच्या प्रेमात पडले. इन्स्टाग्रामवर आम्ही बोलू लागलो, त्यावेळी मला त्याचे खरे नाव माहिती नव्हतं कारण त्याने सोनू या नावाने फेक अकाउंट उघडले होते. आम्हा दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले.

आम्हा दोघांनाही मुलं आवडतात हे आम्ही एकमेकांना सांगितले. त्यावेळी मी मुलगाच होते. माझी कुठलीही शस्रक्रिया झाली नव्हती. पुढे आमची मैत्री प्रेमात बदलली. 2021 मध्ये वृंदावन इथे आमची पहिल्यांदा भेट झाली. त्याला मी आवडत असल्यामुळे मी शस्त्रक्रिया करुन मुलगी व्हावे असे त्याने मला सुचवले.

तो त्याच्या कुटुंबियांशीही माझ्याबद्दल बोलणार होता. त्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही तर इंदूरला येऊन माझ्याबरोबर राहाण्याचे वचन त्याने दिले होते. त्यामुळे जुलैमध्ये मी स्तनांची शस्त्रक्रिया केली.

पुढे ऑक्टोबरमध्ये विभवने माझ्याशी बोलणे बंद केले. त्याने मोबाईल नंबर, इन्स्टाग्राम अकाउंट बंद केले. त्याला भेटायला मी ग्वाल्हेरला गेले मात्र तो पत्ताही खोटा असल्याचे लक्षात आले. विभवने प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. मला लिंग बदलण्यास सांगितले म्हणून मी शस्त्रक्रिया केल्या. असे असताना त्याने मला का फसवले हे जाणून घ्यायचे होते मात्र विभवची भेट न झाल्यामुळे मी इंदूरला परत आल्याचे ही रजनीने सांगितले.

रजनीने विभवच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली, मात्र रजनीशिवाय इतर कुणालाच त्याचा चेहराही माहिती नसल्यामुळे पुरावा नाही म्हणून कारवाई होऊ शकली नाही. यानंतर 3 मार्च 2023 ला होळीच्या दिवशी विभव आणि रजनी यांची अचानक भेट झाली.

रजनी म्हणाली, मी दरवर्षी होळीला वृंदावन येथील अखंडानंद आश्रमात जाते. कुटुंब आणि मित्रमैत्रिणींबरोबर गेले असता आश्रमातील एका खोलीत विभवही आपल्या मित्रांबरोबर आला होता. त्याने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; पण त्याने एकदा मला फसवले असल्यामुळे मी त्याच्याशी बोलले नाही.

माझ्या मित्राकडून माझा नंबर घेऊन विभवने मला फोन केला पण मी त्याचे फोन घेतले नाही. 27 मे रोजी इंदूरला येऊन तो धडकला. त्याने फुलांचा गुच्छ आणला होता. आपली खरी ओळख आणि कागदपत्रे त्याने माझ्या आईला दाखवली आणि आईने माझी शस्त्रक्रिया करुन घेतली तर तो माझ्याशी लग्न करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.

उर्वरित शस्त्रक्रियेसाठी पैसे देण्याची तयारीही त्याने दाखवली. विभवच्या सांगण्याप्रमाणे मी शस्त्रक्रिया करुन घेण्यास सुरुवात केली. अखेरची योनीमार्ग बदलण्याची शस्त्रक्रिया जुलैमध्ये होणार आहे. त्याने अनेकदा मला शस्त्रक्रियांसाठी पैसे दिले.

या काळात त्याने माझ्याशी लैंगिक संबंध ठेवले. कित्येकदा अनैसर्गिक संबंधही ठेवले. फेब्रुवारी महिन्यात त्याने मला कानपुरला त्याच्या घरी बोलावले आणि सांगितले की, आपलं लग्न होऊ शकत नाही, मी फक्त शारीरिक संबंधांसाठीच तुझा वापर केला. माझ्यामुळे तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले, मला माफ कर.

त्याने अनेक कारणं दिली. मी खालच्या जातीतील आहे, मला मूल होऊ शकणार नाही त्यामुळे लग्न करणं शक्य नाही असं म्हणाला. त्याने सॉरी म्हटले पण आता मी ना धड स्त्री आहे ना धड पुरुष, त्यामुळे मी माझे पुढचे आयुष्य कसे जगायचे? असा प्रश्न उपस्थित करत रजनीने इच्छामरणाची मागणी केली आहे.

विजयनगर पोलिस स्थानकांचे प्रभारी सी. बी. सिंह म्हणाले की, मुलाची मुलगी झालेली ट्रान्सगर्ल रजनी हिने कानपुरचा रहिवासी असलेल्या कॅफे संचालक विभव शुक्लाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

फिर्यादीच्या मते आरोपीने इंदूर आणि इंदूर बाहेरही आपल्याशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याचे म्हटले आहे. आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही तिचा दावा आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी एक टीम कानपुरला पाठवण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले आहे.

 

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!