Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पतीचा मोबाईल तपासताना, अधिकाऱ्याच्या पत्नीची १ कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक

Advertisements
Advertisements
Spread the love

बीएआरसीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीची १ कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यास मनाई असल्याने अधिकाऱ्याचा मोबाईल फोन घरीच होता. यावेळी पत्नीने पतीचा मोबाईल तपासताना पाहिलेली लिंकवर क्लिक केल्याने ही रक्कम गमावली आहे.

Advertisements

पनवेल परिसरात राहणारा महिलेचा पती बीएआरसीमध्ये अधिकारी आहे. कामाच्या ठिकाणी मोबाईल आणण्यास मनाई असल्याने पतीचा मोबाईल फोन घरीच असतो. दोन महिन्यांपूर्वी पत्नी पतीचा मोबाईल फोन हाताळत असताना तिला रितू व्होरा नावाच्या महिलेचा मेसेज दिसला.

Advertisements
Advertisements

यामुळे तिने मेसेज वाचला त्यात व्यापारातून नफा झाल्याची माहिती दिली होती. यावर विश्वास ठेवून महिलेने 60 लाख रुपये गुंतवले. त्यातून 12 लाखांचा नफा झाल्याचे तिला सांगण्यात आले.

त्याचा फायदा होत असल्याचा विचार करून दोन महिन्यांत 1 कोटी 92 लाख रुपये संबंधितांच्या खात्यात जमा केले. ही रक्कम त्यांच्याकडून इंदिरा सिक्युरिटी मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे घेण्यात आली होती. आपली फसवणूक झाल्याचे त्यांना दोन महिने लक्षात आले नाही.

दरम्यान, 2 फेब्रुवारी रोजी एका व्यक्तीने तेलंगणामध्ये फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता या महिलेच्याही गुन्हेगारांच्या खात्यात मोठी रक्कम असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!