मुंबईत गोवंडी परिसरात भीषण आग, 20 ते 25 झोपडपट्ट्या जळून खाक

शनिवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील गोवंडी परिसरात भीषण आग लागली. या आगीमध्ये 20 ते 25 झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
गोवंडी-शिवाजी नगर आणि आदर्श नगर परिसरात काही झोपडपट्ट्या आणि दुकाने असल्याची माहिती आहे. बघता-बघता काही क्षणातच आगीने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा घातला. आग लागताच काही स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यामध्ये यश न आल्याने अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
दरम्यान, अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागताच काही काळ स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे घटनास्थळी मोठी खळबळ माजली होती.
या आगीत काही झोपडपट्ट्या जळून खाक झाल्याने स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीत संसार उपयोगी वस्तू डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते. गोवंडी-शिवाजी नग आणि आदर्श नगर हा झोपडपट्टी परिसर असून या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते.
आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करून अनेकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणार्धात आगीचा भडका उडल्याने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा पडला.
त्यामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागेत धाव घेतली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765