Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Crime News Update : पत्नीचे कापलेले शीर घेऊन तो परिसरात फिरत राहिला…

Spread the love

पश्चिम बंगालमधील (West Bengal) पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील पातशपूरमध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून करून तिचे कापलेले शीर घेऊन परिसरात फिरत राहिला.

गौतम गुचैत असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी गौतम गुचैत याने आधी पत्नी फुलराणी गुचैतचा देशी बनावटीच्या चाकूने शिरच्छेद करून खून केला आणि नंतर तिचे कापलेले डोके व हत्याकांडात वापरलेले हत्यार घेऊन तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो एका स्थानिक चहाच्या स्टॉलवर पोहोचला व बराच वेळ तिथल्या बाकावर बसला.

ही बाब समोर आल्यानंतर काही लोकांनी याचा व्हिडिओही बनवला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर गावातील काही लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचे डोके आणि शरीर जप्त केले आणि आरोपी पतीला अटक केली. महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आरोपीकडून या हत्येमागची कारणे जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्येची घटना 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.45 वाजता घडली. गौतम गुचैत हा जिल्ह्यातील पातशपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चिस्तीपूर पूरबा गावचा रहिवासी आहे.

घरगुती वादातून त्याने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आरोपी पत्नीचे कापलेले शीर घेऊन चिस्तीपूर बसस्थानकावर पोहोचला. सुमारे तासभर डोके हातात घेऊन इकडे-तिकडे भटकत राहिला.

गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. सध्या पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. त्याने हा गुन्हा का केला याचा पोलीस शोध घेत आहेत.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!