Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक, बहिणीच्या प्रेमसंबंधामुळे धाकट्या भावाने केला प्रियकराचा शिरच्छेद आईचे कापले मनगट

Spread the love

तामिळनाडूमध्ये एका तरुणाने आपल्या बहिणीची हत्या केली असून तिच्या प्रियकराचा शिरच्छेद केला आणि आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याने तिचे मनगट कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मदुराईतील तिरुमंगलमजवळ मंगळवारी रात्री ही भीषण घटना घडली. हत्येची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रवीणकुमारला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीणकुमारची (22 वर्षे) बहीण ए महालक्ष्मी (वय २५) ही एन सतीशकुमारसोबत (वय 28) रिलेशनशिपमध्ये होती. महालक्ष्मीने चार वर्षांपूर्वी वलयंकुलममधील एका व्यक्तीशी लग्न केले पण लवकरच त्यांचा घटस्फोट झाला होता. ती सध्या कोंबडी इथे आई-वडिलांसोबत राहत होती, याच ठिकाणी नंतर तिचे आणि सतीशकुमारचे एकमेकांवर प्रेम जडले होते.

तिचा धाकटा भाऊ प्रवीणकुमार याला त्यांचे हे नातं  मान्य नव्हतं. बहिण महालक्ष्मीने सतीशकुमारशी संपर्क साधू नये अशी तंबी त्याने दिली होती. मात्र, महालक्ष्मीने हे प्रकरण सुरूच ठेवले आणि मंगळवारी रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास प्रवीणकुमारने सतीशकुमारला कामावरुन घरी परतत असताना बेदम मारहाण केली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने सतीशकुमारवर हल्ला केला, त्याचा शिरच्छेद केला आणि त्याचे शीर जवळच्या थिएटर स्टेज इमारतीत ठेवले. त्यानंतर, त्याने घरी जाऊन आपल्या बहिणीचा गळा धारदार शस्त्राने चिरला. यावेळी त्याची आई ए सेल्वी यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर वार केले आणि तिचा पंजा मनगटापासून छाटला, असल्याचे ही यात म्हटले आहे.

या हल्ल्यात महालक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर प्रवीणकुमार घटनास्थळावरून पळून गेला. सतीशकुमारच्या भावाने कुडाकोविल पोलिसात हत्येची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी प्रवीणकुमारला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!