Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AI चा वापर करून दिल्ली पोलिसांनी किली आरोपींना अटक

Spread the love

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून अनेक गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. मात्र आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी आठवडाभरातच मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला अटक केली आहे.

अनेकदा ओळखीसाठी वृत्तपत्रांमध्ये मृत व्यक्तीची छायाचित्रे प्रसिद्ध केली जातात, परंतु चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने मृत व्यक्तीची ओळख शोधण्यास वेळ लागतो दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आधी मृतदेहाचा चेहरा सामान्य छायाचित्रासारखा दिसण्याचा प्रयत्न केला आणि हत्येचा छडा लावला.

10 जानेवारी रोजी गीता कॉलनी फ्लायओव्हरजवळ 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.  मृतदेहच्या मानेवर जखम असल्याचे आढळून आले असून मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

शवविच्छेदनानंतर, गळा दाबून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. परंतु, मृतदेहाजवळ कोणतेही ओळखपत्र सापडले नाही, त्यामुळे त्याची ओळख पटवण्यात पोलिसांनी यश आले नाही.

तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मारेकऱ्याने अत्यंत हुशारीने गीता कॉलनीच्या उड्डाणपुलाखालील परिसर निवडला होता. त्यामुळे पोलिसांना मृतदेहची ओळख पटवण्यात सर्वात मोठी अडचण येत होती.

याशिवाय मृतदेहाचा फोटो पाहून कोणीही सहज ओळखू शकेल, अशा स्थितीत त्याचा चेहरा नव्हता. त्यामुळे उत्तर दिल्ली पोलिसांनी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७४ अन्वये अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आणि सविस्तर तपास सुरू केला. दरम्यान ओळख पटवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली.

दिल्ली पोलिसांनी AI सहाय्याचा वापर ब्लर कमी करण्यासाठी आणि मृतदेहाचे डोळे उघडण्यासाठी केले. एआय कार्यानंतर, संपूर्ण दिल्ली वृत्तपत्रांमध्ये मृत व्यक्तीचे फोटो प्रसिद्ध केले आणि पोस्टर बनवून दिल्लीच्या विविध भागात लावले. तसेच वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्टर्स पाठवण्यात आले. पोलिसांनी एकूण पाचशे पोस्टर्स छापले होते.

पीडितेचा भाऊ राहुल याने मृतदेहाची ओळख पटल्यावर दिल्ली पोलिसांना फोन केला. यावेळी फोन करणाऱ्याने पोलिसांनी सांगितले की, हा फोटो त्याचा मोठा भाऊ हितेंद्रचा आहे. एकदा ओळख पटल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हितेंद्रच्या प्रोफाइलची तपासणी केली आणि त्याच्या आसपासच्या लोकांची चौकशी केली, जेणेकरून तपास पुढे जाऊ शकेल.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा त्यांना समजले की, हितेंद्रचे तीन तरुणांशी काही कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी ज्या ठिकाणी भांडण झाले होते, तिथे जाऊन चौकशी केली.

यावेळी तिन्ही तरुणांनी हितेंद्रचा गळा आवळून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे समोर आले. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी एका महिलेनेही त्यांना मदत केल्याचे समजले. त्यानंतरच्या तपासात परमवीर सिंग, हरनीत सिंग आणि प्रियंका या तीन आरोपींचा समावेश असलेल्या खुनाचा कट उघडकीस आला.

महिनाभर चाललेल्या वादानंतर या तिघांनी पीडितेचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी या तिघांना 16 जानेवारी रोजी चारही आरोपींना अटक केली असून सध्या याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now : 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!