Maratha Aarakshan LIVE Updates : मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा

Maratha Aarakshan Rally LIVE Updates: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी, लढा देण्यासाठी मनोज जरंगे-पाटील यांनी ‘चलो मुंबई’ची हाक दिली आहे. त्याची हाक ऐकून लाखो मराठे मुंबईकडे निघाले. जरंगे पाटील शनिवारी मुंबईला रवाना झाले असून राज्यातील सकल मराठा समाजाला 24 रोजी मुंबईत दाखल होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Maratha Aarakshan Rally LIVE Updates:
25.01.2024
-
मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याकरिता गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकून अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोणतीही आठकाठी न घातल्याने मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
24.01.2024
-
हायकोर्टाच्या या नोटीस देण्याच्या आदेशानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उत्तर दिले आहे. मराठा आंदोलकांच्या वतीने आमचे वकील कोर्टात जातील. काय आहे ते बघतील. त्यानंतर नोटिशीचं काय करायचे ते बघू , असे सांगत न्यायमूर्ती आम्हाला न्याय देतील, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.
23.01.2024
-
मराठा आरक्षणावर(Maratha Reservation) दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवार 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दुपारी 1.30 वाजता ही सुनावणी होणार असून न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती गवई यांच्यासमोर ही सुनावणी पार पडेल.
-
जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. जालना (Jalna), बीड (Beed) आणि अहमदनगर ( Ahmednagar) असे तीन जिल्ह्यांचा प्रवास करून मनोज जरांगे पुणे (Pune) जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
-
मराठा आरक्षण पदयात्रेला रांजणगाव येथून सुरुवात
-
पुढील तीन दिवसांचा दिनक्रम…
23 जानेवारी
– दुपारी भोजन – कोरेगावं भीमा
– रात्री मुक्काम – चंदननगर ( खराडी बायपास ) पुणे24 जानेवारी
– पुणे शहर प्रवास – जगताप डेअरी – डांगे चौक – चिंचवड – देहूफाटा
– रात्री मुक्काम – लोणावळा25 जानेवारी
– दुपारी भोजन – पनवेल.
– रात्री मुक्कामी – वाशी26 जानेवारी
– चेंबूर वरून पदयात्रा –
– आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होणार आहे.
#WATCH | Pune, Maharashtra: Maratha reservation activist Manoj Jarange Patil begins his padayatra from Ranjangaon. pic.twitter.com/motIjHrKOd
— ANI (@ANI) January 23, 2024
22.01.2024
-
नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
नगर रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी पहाटे तीननंतर टप्याटप्याने वळविण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून नगरकडे जाणारी वाहने कात्रज, खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा, हडपसरमार्गे सोलापूर रस्ता, केडगाव चौफुलामार्गे, न्हावरे, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे जातील.वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटामार्गे सोलापूर रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे. तेथून केडगाव चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहे.
पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बायपास चौकातून उजवीकडे वळून मगरपट्टा चौक, सोलापूर रस्ता, यवत, केडगाव चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.
बुधवारी (२४ जानेवारी) सकाळी पदयात्रा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर पदयात्रा पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे.तेथून पदयात्रा लोणावळ्याकडे जाणार आहे. बुधवारी नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. नगरकडून पुण्यात येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे.
थेऊर फाटा, केसनंद, थेऊरमार्गे वाहतूक सोलापूर रस्त्याने पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वाघोली परिसरातील वाहतूक वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी, केशवनगर, मुंढवा चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. पुण्यातून नगरकडे जाणारी वाहतूक येरवड्यातील चंद्रमा चौक, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगावमार्गे वाघोलीकडे वळविण्यात येणार आहे.
-
मनोज जरांगे पाटील आणि हजारो समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी येणार आहेत.
-
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकने उचलले मोठे पाऊल…
राज्य सरकारकडून वंशावळानुसार कुणबी प्रमाण पत्र देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. वंशावळ प्रमाण पत्रांचे वाटप करण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे.
तहशीलदार व नायब तहशीलदार यांना वंशावळानुसार प्रमाण पत्र वाटपाचे अधिकार दिले जाणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी पाठवल्यचे वृत्त आहे।
-
नाशिक जिल्ह्यात गावचे तलाठी व ग्रामसेवक घरोघरी जाऊन जमा करणार कुणबी असल्याचे पुरावे
नाशिक जिल्ह्यात यापूर्वी सापडलेल्या दोन लाख आठ हजार नोंदी गावनिहाय प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. दरम्यान कोणीही गावाबाहेर जाऊ नये, अशी दवंडी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिबिर घेऊन जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. पण पुरेशा नोंदी न आढळल्याने तलाठी व ग्रामसेवक हे घरोघरी जाऊन कुणबीविषयीचे पुरावे संकलित करणार आहेत.
जिल्ह्यातील कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा यांच्या आढळलेल्या दोन लाख आठ हजार नोंदी जिल्हा प्रशासनाने संकेतस्थळावर अपलोड केल्या आहेत. त्यात बहुतांश नोंदी या मोडी लिपीतील असल्यामुळे त्यात आपले नाव आहे किंवा नाही, याची माहिती गावातील लोकांना मिळत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
-
जरांगे मुस्लिम आरक्षणासाठीही लढणार, नगरमध्ये मोठे विधान मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या पदयात्रेचा आज तिसरा दिवस आहे. बाराबाभळी करंजीघाट येथून मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.
-
जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या दौऱ्याचा पार्श्वभूमीवर बाराबाभळी येथील मदरशावर अक्षरशः भगवे झेंडे लावण्यात आले होते. एखाद्या मदरशावर पहिल्यांदाचा भगवे झेंडे पाहायला मिळाले. त्यामुळे यातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम एकता पाहायला मिळाली आहे.
-
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज शहराजवळील भिंगार गावातील राम मंदिरात मनोज जरांगे आरती करून दर्शन घेतील. याच निमित्ताने ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपला सहभाग नोंदवणार आहे.
21.01.2024
-
दोन दिवसांत मागण्या मान्य केल्या नाहीत, तर त्यापूढे चर्चा कराणार नाही, एकही राजकीय नेत्याने त्यानंतर माझ्या गावात यायचे नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच एखाद्या ओबीसींच्या बुजगावण्याचं ऐकूण मराठा आरक्षण देणार नसतील तर त्यांच्या कचरा केल्याशिवाय राहणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले.
-
मनोज जरांगे-पाटील यांच्या मनधरणीचा प्रयत्न शासनाकडून होत असला तरी अद्यापही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. नाशिक शहरातील मराठा आंदोलनाशी जोडले गेलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलिसांची नजर आहे वेळप्रसंगी नोटीस बजावून कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले जाण्याची शक्यता आहे
अंतरवाली ते मुंबई पदयात्रेची आजची काही क्षणचित्रे…….
आता मुंबई जिंकायची च….!!!#मनोज_जरांगे_पाटील pic.twitter.com/3Jqotrivif— Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting (@Kapil_Zoting) January 20, 2024
-
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याकडून मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून या पदयात्रेत लाखो मराठे सहभागी झाले आहेत. मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे 20 ते 28 जानेवारीदरम्यान सर्व अधिकारी, अंमलदारांच्या साप्ताहिक सुट्टया आणि अन्य रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
-
मराठा समाजाला आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईकडे कूच केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ निवसस्थानी बैठक बोलवली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षित वेळेत अहवाल येत नसल्याने शिंदे समितीने नाराजी व्यक्त केली गेली आहे.
त्यामुळे न्या. शिंदे समितीत आणखी दोन निवृत्त IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन निवृत्त अधिकाऱ्यांना नियुक्त करून त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवालाचा पाठपुरावा केला जाणार आहे. दरम्यान 70 टक्के कुणबी नोंदी आतापर्यंत सापडल्याचे वृत्त आहे.
-
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याबाबत सरकारची वृत्ती असंवेदनशील असल्याची टीका मनोज जरंगे यांनी केली. मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत अनेक तरुणांनी जीवन संपवलं. सरकारने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज होती. पण सरकारने तसे केले नाही. आपण शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धारही मनोज जरांगे यांनी केला आहे.
-
शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी पुढील आंदोलनची दिशा सांगितली. तसेच यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. मी नसलो तरी हा लढा कायम सुरू ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी आंदोलकांना केले आहे.
Maratha Aarakshan Rally LIVE Updates:
मोर्चाचा मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं
- 20 जाने सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून निघणार
- 20 जानेवारी पहिला मुक्काम- शिरूर(बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात
- 21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी-(अ. नगर)
- 22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव-(पुणे जिल्हा)
- 23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास,पुणे
- 24 जानेवारी पाचवा मुक्काम- लोणावळा
- 25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, नवी मुंबई
- 26 जानेवारी 7 मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी पोहोचणार, आमरण उपोषणालाही सुरुवात
सकाळी 9 वाजल्या पासून 12 पर्यंत चालत जाऊयात. आपण देवाकडे जात नाही. आपल्या मागण्यासाठी सरकारकडे जातोय. ज्याला जमेल त्याने चालायचे. नाहीतर बिनधास्त गाडीमध्ये बासायचे. दुपारी 12 पर्यंतच सर्वांनी चालायचे आहे, अशा सूचना मनोज जरांगे यांनी आंदोलकांना दिल्या आहेत.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Maratha Aarakshan Rally LIVE Updates:
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765