गुजरातमध्ये रस्त्याच्या कडेला नमाज पठण करणाऱ्या ट्रक चालकाला अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

गुजरातमधील बनासकांठा येथे परवानगीशिवाय रस्त्याच्या कडेला नमाज पठण करणाऱ्या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. पालनपूर (पश्चिम) पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर बच्हल खान (37) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

व्हिडिओमध्ये तो पालनपूर शहराजवळील एका व्यस्त चौकात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्याच्या ट्रकसमोर नमाज अदा करताना दिसतो, पोलिसांनी सांगितले की, ही घटना 12 जानेवारी रोजी महामार्गावर गर्दीच्या चौकात घडली. खान यांनी ट्रक थांबवून नमाज अदा करण्यास सुरुवात केली. यावेळी कोणीतरी व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला.

Advertisements
Advertisements

अधिकाऱ्याने सांगितले की, खान यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम २८३ (सार्वजनिक मार्ग धोक्यात आणणे), १८६ (कर्तव्य पार पाडण्यात सार्वजनिक सेवकाला अडथळा निर्माण करणे) आणि १८८ (लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन) अंतर्गत एफआयआर नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्हल खानला शनिवारी अटक करण्यात आली.

सोशल मीडियावर लोकांची वेगवेगळी मते

बाचा खान नमाज अदा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून रस्त्याच्या कडेला एवढी जागा असताना रस्त्याच्या मधोमध नमाज का अदा करत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच याप्रकरणी कोणी पोलिसांकडून कारवाईची मागणी करत आहे तर कोणीतरी केवळ व्हिडिओ बनवण्याच्या उद्देशानेच हे केले जात असल्याचा दावा करताना दिसले. दरम्यान, सोशल मीडियावर काही लोक ती व्यक्ती कोणालाच त्रास देत नसल्याचे म्हणत या व्यक्तीचे समर्थन देखील करताना दिसत आहे.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!