Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Pakistan Elections: 55 वर्षात पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये हिंदू महिला लढवणार निवडणूक

Spread the love

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बुनेर मतदारसंघातून पहिल्या हिंदू उमेदवार म्हणून डॉ. सवीरा प्रकाश यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये पुढील महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना किमान ५ टक्के महिला उमेदवार उभे करण्याचे आदेश दिले आहेत.

डॉ. सवीरा प्रकाश ही पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याक आहे. 25 वर्षीय डॉ. सविरा यांनी गेल्या आठवड्यात बुनेर जिल्ह्यातील PK-25 सर्वसाधारण जागेसाठी पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) कडून उमेदवारी दाखल केली.

पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांमध्ये हिंदूंव्यतिरिक्त शीख आणि ख्रिश्चनांचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या वेळी अल्पसंख्याकांची संख्या २० टक्क्यांहून अधिक होती. मात्र आता ही संख्या ३ टक्क्यांवर आली आहे.

पाकिस्तानात तीन प्रमुख पक्ष आहेत, जे नेहमीच सत्तेभोवती असतात. यामध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय), पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांचा समावेश आहे.

डॉ. सविरा प्रकाश यांनी खैबरमधून पीपीपी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेले सविरा यांचे वडीलही राजकारणात होते. डॉ. सवीरा प्रकाश आता पाकिस्तानातील पहिल्या हिंदू उमेदवार आहेत.

डॉ. सवीरा प्रकाशकोण आहेत?

सवीरा प्रकाशचे वडील ओमप्रकाश हे डॉक्टर असून नुकतेच निवृत्त झाले आहेत. ओम प्रकाश गेल्या 35 वर्षांपासून पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सदस्य आहेत. सवेरा स्वतः एक डॉक्टर आहे आणि तिने 2022 मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे.

सवीरा  बुनेरमधील पीपीपी पक्षाच्या महिला विंगच्या सरचिटणीसही राहिल्या आहेत. सविराला महिलांची स्थिती सुधारून त्यांच्यासाठी चांगले वातावरण निर्माण करायचे आहे.

तसेच, सवीरा म्हणते की ती जर निवडणुकीत जिंकले तर ती गरीब आणि वंचितांसाठीही काम करेल. डॉक्टर या नात्याने त्यांनी सरकारी रुग्णालयातील खराब व्यवस्थापन पाहिले आणि त्यांना व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज वाटली आणि म्हणूनच त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

55 वर्षात पहिल्यांदाच एक महिला उमेदवार बुनेरमध्ये निवडणूक लढवणार आहे.

55 वर्षात प्रथमच बुनेर मतदारसंघातून एक महिला उमेदवार निवडणूक लढवत आहे. जिथून सविरा यांनी उमेदवारी दाखल केली आहे. पाकिस्तानमध्ये नामांकनाची अंतिम तारीख 24 डिसेंबर होती आणि सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

 

DGP Rashmi Shukla : राज्याच्या पोलीसमहासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!