Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPNewsUpdate : भाजपचे ठरले !! अबकी बार ४०० पार चे टार्गेट ठेऊन , मोदींच्या देशभरात ४०० सभांचे आयोजन …

Spread the love

नवी  दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  भाजपने तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निमित्ताने आज भाजपच्या मुख्यालयामध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४०० सभांचे देशभर आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘अबकी बार ४०० पार, तीसरी बार मोदी सरकार’ अशी घोषणा ठरवण्यात आली आहे.  २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या झंझावाती सभांना प्रारंभ होईल.

याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या देशव्यापी दौऱ्यांबाबतही  या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी  प्रत्येक जिल्ह्यातून हजारो लोकांना राम मंदिराचं दर्शन घडवण्याबाबत नियोजन करण्याचेही  ठरविण्यात आले आहे.  पार्टी मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह देशभरातील सुमारे १५० नेते उपस्थित होते.

लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने ही  मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  या  निवडणुकांसाठी भाजपाच्या प्रचाराची दिशा आणि घोषवाक्यही ठरवण्यात आले आहे. ‘अबकी बार ४०० पार, तीसरी बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य या निवडणुकीत असणार आहेत. भाजपाने यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही घोषवाक्यांवर मोठा भर दिला होता.

सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने, ‘बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य दिले  होते . तर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘फिर एक बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य घेऊन प्रचाराची रणनिती आखली होती. आता, मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांच्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने आपले  घोषवाक्य निश्चित केले आहे. त्यामुळे, भाजपाकडून एकप्रकारे प्रचाराचा नारळ फुटला आहे, प्रचाराचा शुभारंभ झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!