Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Manipur violence : मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचार, सुरक्षा दलाचे 7 जवान जखमी

Spread the love

Manipur violence : मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचार, सोमवारी चार लोकांचा गोळीबारात मृत्यू झालेला असताना मंगळवारी सुरक्षा दलाचे 7 जवान जखमी झाले आहेत. यात चार पोलीस कमांडो आणि तीन बीएसएफचे जवान आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

नववर्षाचा पहिलाच दिवस मणिपुरात रक्तरंजीत ठरला. या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी एक व्हिडीओ प्रसारित करीत हिंसाचाराचा निषेध केला आहे. तसेच लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या हिंसाचारानंतर थौबल, इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम, काकचिंग आणि बिष्णूपूर या जिह्यात संचारबंदी लावण्यात आली आहे.

मणिपुरातील दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध सीबीआयने दोन वेगवेगळे आरोपपत्र दाखल केले आहेत. सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले आहे.

विविध घटनांमध्ये १८० हून अधिक लोकांचा मृत्यू

२०२३ मध्ये मणिपूर नेहमी चर्चेत राहिले. ३ मे रोजी येथे सर्वात हिंसक घटना घडली. राज्यातील विविध घटनांमध्ये १८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे ६० हजार लोक बेघर झाले आहेत.

४ पोलिस कमांडो, १ बीएसएफ जवान जखमी

मणिपूरच्या मोरेह शहरात मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलीस कमांडो आणि सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला.

थौबल जिल्ह्यातील लिलोंग परिसरात अज्ञात सशस्त्र हल्लेखोर आणि स्थानिक यांच्यात झालेल्या संघर्षात चार नागरिकांचा गोळ्या झाडून मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे.

म्यानमार सीमेजवळ असलेल्या मोरेह येथे जात असताना बंदुकधाऱ्यांनी पोलीस कमांडो वाहनांना लक्ष्य केले. सुरक्षा दलाचे जवान सर्च ऑपरेशन राबवत असताना बंदूकधाऱ्यांनी आरपीजींवर गोळ्या झाडल्या असल्याचे वृत्त आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!