Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PM मोदींना उद्देशून ‘खिसेकापू’ म्हणणे चुकीचे दिल्ली हायकोर्टाने राहुल गांधींना सुनावले

Spread the love

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या खिसेकापू टिप्पणीवरून गुरुवारी (21 डिसेंबर) दिल्ली उच्च न्यायालयाने अशाप्रकारची वक्तव्ये करणे टाळले पाहिजे, म्हणत खडे बोल सुनावले आहे. राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘पिकपॉकेट'(खिसेकापू) म्हणाले होते. त्यांची ही टीका योग्य नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधातील या प्रकरणात योग्य निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने (Delhi High Court) निवडणूक आयोगाला आठ आठवड्यांची मुदत दिली आहे. यासोबतच अशा विधानांबाबतचे नियम अधिक कडक करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी २१ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना पीएम मोदींना खिसेकापू, पनौती मोदी, अशी टीका केली होती. मोदी टीव्हीवर येऊन कधी हिंदू-मुस्लिम करतात, तर कधी क्रिकेटच्या सामन्यांना जातात. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे, हे मोदींचे काम आहे, अशी टीका त्यांनी केली होती.

कार्यवाहक मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, कथित विधाने योग्य नाहीत. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करावी. हायकोर्टाने या संदर्भात राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून उत्तर दाखल करण्याची मुदत संपली आहे आणि कोणतेही उत्तर आलेले नाही हे लक्षात घेऊन, न्यायालयाने निवडणूक आयोगाला या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे.

राहुल गांधी काय म्हणाले? काय आहे प्रकरण?

21 नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, पीएम म्हणजे पनौती मोदी. मोदी टीव्हीवर येऊन कधी हिंदू-मुस्लीम करतात आणि कधी क्रिकेटच्या सामन्याला जातात. ही वेगळी गोष्ट आहे की तिथे गेल्यावर टीमचा पराभव झाला. नागरिकांचे लक्ष इतर मुद्यांवर वळवणे हे पंतप्रधान मोदींचे काम आहे. खिसेकापूदेखील असेच असतात. दोन खिसेकापू येतात. एक तुमच्यासोबत बोलतो आणि तुमचे लक्ष इतरत्र वळवतो. त्याच वेळी दुसरा खिसेकापू येऊन तुमचा खिसा कापतो.

हे वक्तव्य राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून केले होते. क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेले होते यात भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांना पनौती म्हणण्याचा ट्रेंड सुरू झाला होता. राहुल गांधी यांच्या सभेतही उपस्थितांनी पंतप्रधान मोदींना पनौती म्हटले होते. यादरम्यान राहुल गांधी यांनी हि टीका केली होती.

 

लोकसभेत नवे विधेयक मंजूर, केंद्रीय निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळले

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!