Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : २० कोटींचा असा दरोडा , ना तुम्ही कधी ऐकला असेल , ना तुम्ही कधी पहिला असेल… अवघ्या ३२ मिनटात लूट करून दारोडेखोर पसार !!

Spread the love

डेहराडून : उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये धनत्रयोदशीच्या अवघ्या 32 मिनिटांपूर्वी दरोडेखोरांनी रिलायन्स ज्वेलरी शोरूम फोडून 20 कोटींचे दागिने घेऊन पलायन केले. शोरूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घाबरवण्यासाठी चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत काहींना बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दरोडेखोर  निघून गेल्यानंतरही काही महिला कर्मचाऱ्यांना भीतीने आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, चार चोरटे शोरूममध्ये घुसले . त्यांचे काही साथीदारही बाहेर उभे होते. राजपूर रोडवर असलेल्या रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये दरोड्याची ही घटना घडली.

अवघ्या 32 मिनिटांत दरोडा

राजपूर रोडवर असलेले शोरूम सकाळी 10.15 वाजता उघडले होते. शोरूमचे 11 कर्मचारी ग्राहक येण्यापूर्वीच दागिन्यांची लावालाव करत होते. डिस्प्ले बोर्डमध्ये 20 कोटींहून अधिक किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते. त्याचवेळी सकाळी 10.24 वाजता मास्क घातलेले चार चोरटे शोरूममध्ये घुसले. त्यांनी आधी सुरक्षा रक्षक हयात सिंगला आत ओढले. यानंतर शोरूममधील संपूर्ण कर्मचार्‍यांना बंदुकीच्या धाकावर ओलिस करून सर्वांचे मोबाईल जप्त केले. काही कर्मचाऱ्यांनी विरोध केला असता हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली.

यानंतर हल्लेखोरांनी कर्मचाऱ्यांचे हात प्लास्टिकच्या बँडने बांधले आणि शोरूमच्या पॅन्ट्री रूममध्ये (स्वयंपाकघर) सर्वांना कोंडले. काही महिला कर्मचाऱ्यांना धमकावून डिस्प्ले बोर्डवर लावलेले दागिने काढून बॅगमध्ये टाकण्यास भाग पाडले. यानंतर चोरट्यांनी तीन महिला कर्मचाऱ्यांना किचनमध्ये कोंडले. 10.56 वाजता दरोडेखोरांनी दागिने पाठीत भरून घटनास्थळावरून पळ काढला.

आजूबाजूला खूप हालचाल सुरू होती, त्याची कोणालाच कल्पना नव्हती.

हे शोरूम राजपूर रोडवरील ग्लोब चौकाजवळ आहे. ज्या कॉम्प्लेक्समध्ये शोरूम आहे ती चार मजली इमारत असून तळघरात पार्किंग आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते मात्र चोरट्यांनी अर्धा तास शोरूममध्ये लूटमार सुरू ठेवल्याने कोणालाही याची कल्पना आली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हाच आसपासच्या लोकांना दरोड्याची घटना घडल्याचे समजले. मात्र, दरोडेखोर आपल्या दुचाकीवरून पळून जात असताना जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाले.

सीएम धामी यांनी पोलिस अधिकाऱ्यांना बोलावले

राजधानीत चोरीच्या इतक्या मोठ्या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कठोर भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालक अशोक कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एपी अंशुमन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि बैठकीनंतर लवकरात लवकर हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले. ज्या रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये हा दरोडा पडला आहे ते सचिवालय आणि पोलीस मुख्यालयाच्या अगदी जवळ आहे आणि तरीही एवढा मोठा गुन्हा करून हे चोरटे सहज पळून गेले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!