Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका , मुख्यमंत्र्यांकडून एअर अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था…

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकनाथ खडसे यांच्या उपचारासाठी तातडीनं एअर अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे. खडसेंना पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यात येणार आहे.

माजी मंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आणला. जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. खडसे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समजताच त्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली.

एकनाथ खडसे यांना मुंबईला हलविण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, तातडीने उपचार करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दाखल घेतली. त्यांनी प्रशासनाला खडसे यांच्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याचा सूचना दिल्या. काही वेळातच खडसे यांना मुंबईत आणण्यात येईल आणि त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!