Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चंद्रयान ३ मुळे चंद्रावर भारताचा तिरंगा फडकताच आ. अमोल मिटकरी यांनी घेतली मनू आजोबाची फिरकी …

Spread the love

मुंबई : भारताची चंद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर देशभरातुन तासेच जगभरातून भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इस्रोच्या अथक परिश्रमामुळे भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनीही इस्रोचं अभिनंदन करताना गांधी , नेहरू आणि तिरंग्याचा अवमान करणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

आपल्या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की , “‘मनु’ आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला. लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी, पण हे खरं हाय अन् यात नेहरूजीचं योगदान बी हाय म्हणत्यात. आता कसं. जयहिंद.” आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचीही आठवण काढताना म्हटले आहे की , “हा भारत माझा देश आहे. या क्षणी अब्दुल कलाम आणि विक्रम साराभाई यांची आठवण येते आहे.” याशिवाय देशातील कार्मकांडावर टीका करताना त्यांनी पुढे म्हटले आहे की , “भारतीय शास्त्रज्ञांना मानाचा मुजरा. हे यश केवळ तुमचे आणि तुमचेच. कुठल्याही कर्मकांडाने व प्रार्थनाने हे यशस्वी झाले नाही. यामागे शास्त्रज्ञांची अखंड मेहनत आहे,” असंही स्पष्ट मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं.

याशिवाय चांद्रयान ३ चं लाईव्ह प्रक्षेपण पाहत असतानाचा आपला एक व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की , “चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. हा विक्रम ज्यांच्या मेहनतीमुळे शक्य झाला त्या सर्व वैज्ञानिकांना सलाम.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!