Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : बसची सामोरा समोर धडक , ५ ठार , २२ जखमी

Spread the love

बुलढाणा : मलकापूर शहराजवळून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 6 वर पहाटे 3 च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 22 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमरनाथ यात्रा करून हिंगोलीकडे परतणाऱ्या बालाजी ट्रॅव्हल्स क्रमांक MH 08- 9458 तर नागपूरकडून नाशिककडे जात असलेल्या रॉयल ट्रॅव्हल्स क्र. MH 27 BX 4466 या दोन्ही वाहनांचा चा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले असून दोन्ही ट्रॅव्हल्स मध्ये असणाऱ्या प्रवाशांपैकी 22 जण गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचार करिता उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे दाखल केले असता त्यांना पुढील उपचाराकरिता बुलढाणा येथे रेफर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच डीवाय एसपी दयाराम गवई, पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तायडे यांच्या सह कर्मचारी दाखल झाले. मलकापूर पोलिस कर्मचारी तथा परिसरातील विविध नागरिक मदतीला घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे या अपघातातील अनेकांना तात्काळ उपचारार्थ हलविण्यात येऊन अनेकांची प्राण वाचले. झालेल्या अपघातामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. एक तासाच्या कालावधीनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने घटनास्थळी दाखल झाले. कुठल्याही क्षणाचा विलंब न करता मलकापूर शहर पोलिसांनी जखमींना आपल्या वाहनात रुग्णालयात हलवले.

या पैकी एक बस हिंगोली तालुक्यातील भांडेगाव परिसरातून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांची होती २२ दिवसानंतर घारी परत येत असताना हा अपघात झाला. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर मयतांचे नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले आहेत. उपस्थितन्ही दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील शिवाजी धनाजी जगताप (55) हे मागील पाच ते सहा वर्षापासून दरवर्षी खाजगी बसने अमरनाथ यात्रा काढतात. त्यासाठी परिसरातील भाविकांची नोंदणी करून त्यांना यात्रेमध्ये सहभागी करून घेतले जाते.

दरम्यान, मागील 22 दिवसांपुर्वी त्यांनी यात्रा काढली होती. त्यासाठी भांडेगाव, लोहगाव, जयपूर, डिग्रस कऱ्हाळे, साटंबा या गावातील भाविकांनी नोंदणी केली होती. सुमारे 30 भाविक या यात्रेत सहभागी झाले होते. अमरनाथ येथून दर्शन घेऊन सर्व भाविक गावाकडे परत येत होते. मात्र मलकापुर –धुळे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे तीन वाजता त्यांच्या बसला नागपूर येथून नाशीककडे जामाऱ्या एका खाजगी बसने (एमएच-27-बीएक्स-4466) समोरासमोर धडक दिली. या भिषण अपघातात भाविकांच्या बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला.

यांचा मृतांमधे सामावेश आहे …

मृतांमध्ये 1. शिवाजी धनाजी जगताप (55, भांडेगाव), 2. बस चालक संतोष आनंदराव जगताप (38 भांडेगाव) 3. राधाबाई सखाराम गाडे (50, जयपूर), 4. सचिन शिवाजी माघाडे (30लोहगाव), 5. अर्चना गोपाल घुक्से (30, डिग्रस कऱ्हाळे) यांचा समावेश आहे. तर 22 प्रवासी जखमी असून यामध्ये गिताबाई बद्रीनाथ कऱ्हाळे (46 डिग्रस कऱ्हाळे) यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व जखमींना बुलढाणा येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे मलकापूर पोलिसांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांनी मलकापूर पोलिसांशी संपर्क साधून जखमींबाबत चौकशी केली आहे. तसेच मयतांच्या नातेवाईकांना माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!