Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

Spread the love

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद येथे मोठी दुर्घटना घडली असून भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अहमदाबादच्या एसजी महामार्गावरील इस्कॉन पुलावर हा भीषण अपघात झाला.

जॅग्वार कारने पुलावरील लोकांना चिरडले, त्यात ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये १ पोलीस शिपाई व एक होमगार्ड यांचाही समावेश असून आणखी काही जखमी झाले आहेत.

महिंद्रा थार गाडी रात्री १ वाजताच्या सुमारास ट्रकला धडकली, या अपघातातील जखमींच्या मदतीसाठी लोक एकत्र जमा झाले होते.

त्याचवेळी अंदाजे १२० च्या गतीने आलेल्या जॅग्वार कारने पुलावरील लोकांना उडवले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!