Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Manipur Violence Update : मणिपूर प्रकरणी दोषींना सोडले जाणार नाही, पंतप्रधान मोदींचे आश्वासन; मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाईचे आदेश

Spread the love

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज जेव्हा आपण या लोकशाहीच्या मंदिरात श्रावण या पवित्र महिन्यात भेटत आहोत.

मला विश्वास आहे की सर्व खासदार मिळून लोकांच्या जास्तीत जास्त कल्याणासाठी याचा उपयोग करतील आणि खासदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील.”

“मी देशाला आश्वासन देतो की, मणिपूर प्रकरणी कोणत्याही दोषींना सोडले जाणार नाही. मणिपूरच्या मुलींसोबत जे घडले ते कधीही माफ न करणारे कृत्य आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

याबाबत पहिल्यांदा बोलताना मोदी म्हणाले की , “मला वेदना आणि संताप आहे. मणिपूरमधील घटना आपल्यासमोर आली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी आहे.

मी सर्व मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करावा – विशेषत: महिलांच्या सुरक्षेसाठी,” असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या ७३ दिवसांपासून मणिपूर  वांशिक हिंसाचाराच्या विळख्यात आहे, परंतु आता दोन महिलांच्या विवस्त्र व्हिडिओवरून मणिपूरमध्ये तणाव पसरला आहे. माहितीनुसार हा व्हिडिओ४ मे चा असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणि दोन्ही महिला कुकी समुदायातील आहेत, तर महिलांची विवस्त्र परेड करणारे पुरुष हे सर्व मेईतेई समुदायातील आहेत. दोषींवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी संघटना इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने केली आहे.


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!