#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
Thursday | 29.June.2023
-
राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी मणिपूरमधील इंफाळ येथील एका मदत शिबिरातील हिंसाचारग्रस्त लोक आणि तेथे राहणाऱ्या कुटुंबांची भेट घेतली.
#WATCH | Congress leader Rahul Gandhi visited a relief camp in Imphal, Manipur this evening and met the violence-affected people and families staying there. pic.twitter.com/Fe6I84izgE
— ANI (@ANI) June 29, 2023
-
अमरावती : कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दोन जण जागीच ठार
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता
-
देशात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न दूर व्हावा, खासदार इम्तियाज जलील यांचं पांडुरंगाकडे मागणं
-
मुंबई गोवा महामार्गावर दोन बसची धडक झाली. पळस्पे फाट्याजवळील साईकृपा हॉटेलसमोरील घटना. एसटी आणि जेएसडब्ल्यू कंपनीची बस एकमेकांवर आदळल्याने प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पडतात तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.तर अनेकजण किरकोळ जखमी झाले असून सर्वांना पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
- पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या बोलेरोचा भीषण अपघात; सहाजण गंभीरलोधवडे (ता. माण) जवळ पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बोलेरो गाडी क्रमांक एमएच ११बीएच ०८९६ या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो गाडी पूर्णपणे पलटी झाली असून, चालक कल्याण भोसले (वय 45), अण्णा गाढवे (वय 42), पप्पू भिसे (वय 40), दादासाहेब थोरात (वय 42), सागर भोसले (वय 45), विजय माने (वय 45), श्रीमंत पवार (वय 50), रुद्र भोसले असे आठ जण प्रवास करत होते. त्यातील सहा जणांना गंभीर इजा झाली आहे. यातील एकाला गंभीर दुखापत झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
-
संभजीनगर (Aurangabad) सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबरनंतरच; सहकारमंत्री अतुल सावे यांची मोठी घोषणा
-
आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस यावेत. राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा. पाऊस पडू दे, प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी घातलं. सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पुजेचा मान मला मिळाला, त्यामुळं मी स्वता:ला भाग्यवान समजतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.
-
राज्यभरात बकरी ईद उत्साहात साजरी, अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम पार.
-
महाराष्ट्र-केरळ किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढगांचे डोंगर (ऑफ शोअर ट्रफ) तयार झाल्याने आगामी पाच दिवस कोकण व गोवा भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाटाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
– कोकण, गोवा (रेड अलर्ट) : दि. 29 जून ते 3 जुलै
– कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाट : (रेड अलर्ट) : 48 तास.
– मध्य महाराष्ट्र : 29 व 30 जून : (मुसळधार)
– मराठवाडा : 29 व 30 जून : (मध्यम पाऊस)
– विदर्भ : 29 व 30 जून : (मध्यम पाऊस)
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055