#MahaClassified – महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी मेगा भरती जाहीर

वनविभागातील “वनरक्षक (गट क)” पदांची 2138 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया वनविभागातील “वनरक्षक (गट क)” पदांची 2138 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. ऑनलाईन अर्ज १० जुन २०२३ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुन २०२३ आहे.
- पदाचे नाव – वनरक्षक
- पदसंख्या – २१३८ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
सर्वसाधारण प्रवर्ग: रु. १०००/-
मागास प्रवर्ग: रु. ९००/- - अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १० जुन २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जुन २०२३
- निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा
- अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
वनरक्षक
1. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
2. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( १० वी ) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
3. माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
4. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
(टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)
5. अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
6. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
वनरक्षक पदाकरिता अर्ज करताना उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकेल.
अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
उमेदवाराने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर क्लिक करावे. या टॅब मध्ये अर्ज करण्याकरिता लिंक उपलब्ध राहील. तसेच या टॅबवर जाहिरात उपलब्ध आहे. सदर जाहीरातीचे अवलोकन करुनच उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे. तसेच, उमेदवार काह्लील दिलेल्या लिंक वरून देखील अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
-
ऑनलाईन अर्ज १० जुन २०२३ पासून सुरु होतील.
-
तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुन २०२३ आहे.
-
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
-
उमेद्वारंची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल.
-
ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस.
-
आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
-
ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येतील.
-
ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
-
परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
-
परीक्षा ही २ तासाची राहील.
-
उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार
-
लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
-
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
पूर्ण सिलॅबस व परीक्षा माहिती येथे क्लिक करा
-
PDF वन विभाग जाहिरात : https://shorturl.at/opuFP
-
ऑनलाईन अर्ज करा (लिंक १० जून २०२३ पासून सुरु होईल) : https://shorturl.at/bckxM
-
वन विभाग अधिकृत वेबसाईट : mahaforest.gov.in
वन विभाग
#MahaClassified – पुणे महानगरपालिका अंतर्गत “क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदांची भरती
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow
DLA Dance Academy For More details call now
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055