Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CycloneBiparjoyUpdate : बिपरजॉय वादळाने उडवली झोप , गुजरात , राजस्थानात हाहाकार ..

Spread the love

जयपूर  : चक्रीवादळ बिपरजॉयने कच्छ-सौराष्ट्रच्या किनारपट्टीला ओलांडले असून  राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, देण्यात आला आहे . या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी  गुजरातमधील चक्रीवादळाच्या स्थितीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले. बिपरजॉय चक्रीवादळ काही वेळात जखाऊ बंदरावर धडकणार  असल्याचे वृत्त आहे.

बिपरजॉय वादळाने गुजरातमध्ये थैमान घातले असून  राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. विजेचे खांब पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ जखाऊ बंदराजवळ कच्छ आणि सौराष्ट्र किनारपट्टीला ओलांडले. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ११५  ते १२५ किमी होता. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, चक्रीवादळ आता समुद्राकडून जमिनीकडे सरकत आहे आणि त्याचा वेग ताशी १०५  ते ११५  किमी इतका कमी झाला आहे. बिपरजॉयचे आता तीव्र चक्रीवादळ श्रेणीत रूपांतर झाले आहे. आज  राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

गुजरातमध्ये जोरदार पाऊस

गुजरातचे मदत आयुक्त आलोक पांडे यांनी सांगितले की, चक्रीवादळ बिपरजॉय सध्या कच्छ-पाकिस्तान सीमेला स्पर्श करत असून वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ७८ किमी आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, वादळ उद्या दक्षिण राजस्थानमध्ये पोहोचेल आणि तेथे पाऊस पडेल. सखल भागात लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुराची शक्यता आहे. उद्या गुजरातमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये कच्छ, पाटण, बनासकांठा येथे अधिक पाऊस पडेल आणि इतर ठिकाणी पाऊस पडेल.

पांडे यांनी पुढे सांगितले की, चक्रीवादळामुळे सुमारे २२  लोक जखमी झाले आहेत तर २३  जनावरांचा मृत्यू झाला आहे तर ५२४ 2झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत.त्यामुळे ९४०  गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

९९  रेल्वे गाड्या रद्द

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ‘वॉर रूम’मध्ये थेट बैठक घेतली. त्यांनी रेल्वे ट्रॅक, ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) आणि इतर समस्यांवर चर्चा केली. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

पश्चिम रेल्वेने सांगितले की आणखी 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, ३ गाड्या शॉर्ट टर्मिनेशन करण्यात आल्या आहेत आणि ७  गाड्या शॉर्ट-ओरिजिनेटेड आहेत. यासह, एकूण ९९  गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, ३९  गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत, तर ३८  ट्रेन शॉर्ट-टर्मिनेटेड आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

तिन्ही सेना दलाल दक्षतेच्या सूचना

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी तिन्ही सेना प्रमुखांशी संवाद साधला आणि चक्रीवादळ बिपरजॉयच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांच्या तयारीचा आढावा घेतला. सज्जतेचा आढावा घेतल्यानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सशस्त्र दल सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

चक्रीवादळाचा संभाव्य ठोठावण्यापूर्वी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) गुजरात आणि महाराष्ट्रात मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी एकूण 33 टीम्स नेमल्या आहेत. NDRFच्या 18 तुकड्या गुजरातमध्ये ठेवण्यात आल्या आहेत, तर एक टीम दीवमध्ये तैनात करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!