Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लैंगिक शोषण प्रकरण : आतापर्यंत खा. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई न झाल्याने कुस्तीपटू संतप्त

Spread the love

नवी दिल्ली : बजरंग पुनियासह अनेक कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर पुन्हा भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आपले आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलक कुस्तीपटूंच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. कुस्तीपटू साक्षी मलिकने सांगितले की, आम्ही दोन दिवसांपूर्वी सीपी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु कोणतीही सुनावणी झाली नाही. सात मुलींनी एफआयआर दाखल केला. एक मुलगी अल्पवयीन आहे आणि पॉस्कोच्या आत येते. अडीच महिने उलटले तरी समितीकडून कोणताही निर्णय झालेला नाही.

कुस्तीपटू साक्षी मलिकने सांगितले की, हे लैंगिक छळाचे प्रकरण असून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल आहे. परंतु खटल्याची सुनावणी झाली नाही, त्यामुळे पुन्हा आम्हाला जंतर मंतरवर परत यावे लागले आहे. लोक आम्हाला खोटे समजू लागले आहेत. लोकांना वाटलं की आम्ही खोटं बोलतोय. आम्ही आमचे करिअर, भविष्य आणि कुटुंब पणाला लावले आहे, ज्याच्या विरोधात आम्ही लढत आहोत तो खूप मजबूत आहे, त्यांच्यासोबत कोण आहे, कोण नाही हे तुम्हाला चांगले माहीत आहे. काही जण तीन महिन्यांपासून सर्वांकडून वेळ मागत आहेत, क्रीडामंत्री व मंत्रालयाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. आम्ही संपलो, म्हणूनच आम्ही आंदोलन करत आहोत, असे लोक म्हणत आहेत.

साक्षी मलिकच्या डोळ्यात अश्रू

माध्यमांशी बोलताना साक्षी मलिक भावूक झाली होती ती पुढे म्हणाली की , आम्ही आमच्यापुढे कुस्तीचे भविष्य आणि खेळाडूंचे भवितव्य पणाला लावू शकत नाही. ७ मुलींमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूही आहेत. मी नावे सांगू शकत नाही. आम्ही पुरावे दिले नसल्याचे बोलले जात आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडून पुरावे का घेतले नाहीत. पीडितेला आयुष्य असते, मुलगी समोर येऊन उभी राहिली तर तिच्यासाठी तिचे आयुष्य काय उरणार ? बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांनी पत्रकारांशी बातचीत केली.

आतापर्यंत कारवाई न झाल्याने कुस्तीपटू संतप्त

विशेष म्हणजे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे. याप्रकरणी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मागील कामगिरीदरम्यान खेळाडूंना मिळालेल्या आश्वासनावर कारवाई होत नसल्याने कुस्तीपटू संतापले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमची हाक आहे की आमचे ऐकावे, कुस्ती सुरक्षित हातांमध्ये जावी असे आम्हाला वाटत आहे. आमच्या तक्रारीवर कारवाई केली जात नाहीय. आता या लोकांनी आम्ही संपल्याचे सांगायला सुरुवात केली आहे, आम्हाला खोटे पाडण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन साक्षी हिने केले आहे. आम्ही जंतर मंतरवरच मरू, अवघ्या देशाने पाहूदे तरी. बृजभूषण यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी फोगाटने केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!