Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात नेमकं काय झालं?

Spread the love

ऐन उन्हाळ्यात पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी २० लाखांचा जनसमुदाय एकत्रित आणणे सरकारच्या चांगलेच अंगलट आले आहे. खारघर येथील मैदानावर पाच तास बसावे लागल्यामुळे शेकडो सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवला. अखेर उष्माघाताचा त्रास सहन न झाल्याने १३ सदस्यांचा नाहक बळी गेला तर ६०० जणांना उष्माघात. नवी मुंबई पनवेल परिसरातील विविध रुग्णालयात उष्माघातामुळे उपचारार्थ दाखल झालेल्या अन्य ४० सदस्यांपैकी चार ते पाच सदस्य अत्यवस्थ आहेत.

पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी खारघर येथे आले होते. निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा पाहण्यासाठी पाहण्यासाठी तब्बल २० लाख सदस्यांची उपस्थिती असल्याचे वृत्त आहे.  शासन यंत्रणेने आयोजनाची सर्व तयारी पूर्ण केली होती परंतु कार्यक्रमात भर उन्हात सदस्यांना तब्बल सहा-तास बसवून ठेवले. उष्माघाताच्या त्रासामुळे अनेक सदस्य बेशुद्ध होऊ लागले होते. त्यात कार्यक्रम संपण्यास दुपारचे दीड वाजले. त्यानंतर एवढा मोठा जनसमुदाय खारघर परिसरातून बाहेर पडण्यास पुढचे दीड ते दोन तास लागले.  उपस्थित जनसामुदायाला प्यायला पाणी कमी पडल्याने अनेकांना जागोजागी भोवळ येत होती.  त्यात बस स्थानक, रेल्वे स्थानकाकडे चालत जाणे देखील सदस्यांना कठीण झाले होते. जी सार्वजनिक वाहने सदस्यांना नेण्यासाठी ठेवण्यात आली होती, ती वाहने बराच वेळ ट्रॅफिक मध्ये अडकून पडल्याने अनेक सदस्यांना भर उन्हात तीन चार किलोमीटर चालणे भाग पडले.

उष्माघातामुळे त्रास असह्य झाल्यामुळे वाशी येथील महापालिका रुग्णालय, कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय, खारघर येथील मेडीकोव्हर रुग्णालय व खारघर येथील टाटाच्या ॲट्रॅक्ट रुग्णालयात जवळपास ३८ ते ४० सदस्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.  त्यापैकी अनेक रुग्ण अत्यवस्थ झाले होते. तर काही सदस्य जागेवरच बेशुद्ध झाले. रविवारी रात्री उशिरापर्यंत अकरा सदस्यांचा नाहक बळी गेल्याची माहिती सरकारी यंत्रणांनी दिली. तर उपचार घेणारे आणखीन चार-पाच सदस्य अत्यवस्थ असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाला घोर लागला आहे.

मृत पावलेल्या रुग्णांची माहिती सांगण्यास यंत्रणांकडून टाळाटाळ होऊ लागल्याने अनेक नातेवाईक संभ्रमात पडले होते‌. त्यांना कुठल्याच प्रकारची माहिती मिळत नव्हती.  दरम्यान, रात्री उशिरा १३ मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रत्येक मृतदेहासोबत एक माणूस व गाडी शासनातर्फे देण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या त्यांच्या गावी त्यांचे नातेवाईक घेऊन जाणार असल्याचे संगण्यात येत आहे.

सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला ते म्हणाले की, खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही अनुयायांचा उष्माघातामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. दरम्यान, मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत देणार असल्याचे सांगितले आहे.

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी नियोजनावर ताशेरे ओढले

उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी जखमींची भेट घेतली दरम्यान, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर दोघांनीही महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील नियोजनावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमासाठी ठरवण्यात आलेल्या वेळेबद्दल प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रमाची चुकीची वेळ कोणी दिली? ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला गालबोट लागले. सरकार या घटनेची चौकशी करेल की नाही माहिती नाही. पण, अमित शाहांना दौऱ्यासाठी जायचे असल्याने हा कार्यक्रम भर दुपारी घेतला असेल, तर याची चौकशी कोण करणार? या घटनेत निरपराध जीव गेले आहेत. उष्माघातामुळे या १३ सेवकांचा मृत्यू झाला. अमित शाहांना वेळ नसल्याने जर हा कार्यक्रम दुपारी ठेवला असेल, तर हा दुर्दैवी प्रकार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्याच्या निर्णयावर सर्वचजण समाधानी होते. पण एखाद्या कार्यक्रमात हलगर्जीपणा झाल्यावर काय घडू शकते, हे काल समजले. त्यामुळे महाराष्ट्र भूषणसारख्या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला काळा डाग लागला. अजूनही किती लोकं मृत्यूमुखी पडली, हा आकडा समोर येत नाही. करोनाच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही कधीही मृतांचा आकडा लपवायचे नाहीत, त्यांनी तशा सूचना दिल्या होत्या. अनेक एमजीएम पनवेल, एमजीएम वाशी, टाटा आणि डीवायएम रुग्णालयातही रुग्ण आहेत. या सोहळ्यात नेमके कितीजण जखमी झाले आहेत, याबाबत ठोस माहिती नसल्याचे ही अजित पवार यावेळी म्हणाले.


या सोहळ्यात मृतांपैकी ८ मृतांची ओळख पटलेली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. १) श्रीमती वायचळ २) तुकाराम वांगडे ३) महेश गायकर ४) मंजुषा भाबंडे ५) स्वप्नील केणे ६) संगीता पवार ७) जयश्री पाटील ८) भीमा साळवी, अशी मृतांची नावे आहेत. उर्वरित ३ मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून, अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारांचा सर्व खर्च सरकार करील.

बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी “हरवले व सापडले” समितीचे प्रमुख ७९७७३१४०३१ व तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास ०२२-२७५४२३९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Weather update | या आठवड्यातही राज्यामध्ये पावसाळी वातावरण कायम


Political News | कर्नाटक निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिला भाजपला दणका

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

आपलं सरकार

Click to listen highlighted text!