Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Political News | कर्नाटक निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिला भाजपला दणका

Spread the love

१० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी रविवारी (१६ एप्रिल) रोजी आमदार पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ६७ वर्षीय शेट्टर यांनी पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. त्याच वेळी, शेट्टर यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडींमुळे वैतागून मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे आणि माझ्या पुढील वाटचालीबद्दल कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहतील असा मला विश्वास आहे. शेट्टर यांचा हा निर्णय निराशाजनक असल्याचे येडियुरप्पांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाने हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून तिकीट नाकारल्यास किमान २० ते २५ जागांच्या मतदानावर याचा परिणाम होईल, असा इशारा जगदीश शेट्टर यांनी शनिवारी दिला होता. जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर ते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.

शेट्टर हे हुबळी-धारवड मध्य येथील आमदार असून, या आठवड्याच्या सुरुवातीला पक्षश्रेष्ठींनी त्यांना या वेळी निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितल्याने ते नाराज आहेत. भाजपने अद्याप १२ मतदारसंघांसाठीच्या उमेदवारांची घोषणा केली नसून, यात शेट्टर यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यांनी उत्तर कन्नड जिल्ह्यामधील सिरसीमध्ये विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांच्याकडे राजीनामा दिला. भाजपने शेट्टर यांना तिकीट नाकारल्यानंतर आता काँग्रेसने त्यांना पक्षात प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले आहे.

शेट्टर यांच्या समर्थनार्थ हुबळी-धारवाड महापालिकेच्या १६ नगरसेवकांनी शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्याकडे आपले राजीनामे देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या सर्वांनी आपुलकी दाखवल्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत, असे शेट्टर म्हणाले. दरम्यान, बी.एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकची जनता जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सावदी यांना माफ करणार नसल्याचे म्हणाले असून जनतेसमोर या दोन्ही नेत्यांचे सत्य आणणार असल्याचे देखील येडियुरप्पा म्हणाले.

 

काँग्रेस ४३ उमेदवारांची तिसरी यादी

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ४३ उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी जाहीर केली. यात वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची कोलारमधूनही निवडणूक लढवण्याची विनंती फेटाळण्यात आली या मतदारसंघात पक्षाकडून कोथूर जी. मंजूनाथ रिंगणात उतरणार आहेत, सिद्धरामय्या यांना वरुणा येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने तिकीट न दिल्याने नाराज होऊन शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांना बेळगावी जिल्ह्यातील अथणी येथून तिकीट देण्यात आले आहे.

 

 

AtiqAhmedNewsUpdate : अतिक आणि अशरफ यांच्या हत्येवर कोण काय म्हणाले ? विरोधकांचा सरकरवर हल्ला , भगवान रामाच्या नावाचा वापर कशासाठी ?

 

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

आपलं सरकार

Click to listen highlighted text!