Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : चर्चेतली बातमी : मुख्यमंत्र्यांचा आपल्या सर्व मंत्र्यांना हाय अलर्ट , मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश !!

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना तातडीने मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश मानून मुंबईबाहेर असलेले सर्व मंत्री मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. आज दुपारी एक वाजण्यापूर्वी सर्व मंत्री मुंबईत हजर राहणार असल्याचे वृत्त आहे.

Advertisements

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने मुंबईत हजर राहा असे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच सर्व मंत्री आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत.

Advertisements
Advertisements

दरम्यान आज दुपारी एक वाजेपर्यंत सर्व मंत्री मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिमध्ये सर्व मंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. तातडीने बैठक का बोलावण्यात आली याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा आमदारांच्या अपात्रेबाबतचा निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडी पहाता या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!