Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द

Spread the love

मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात सुरत न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे. त्यांना उच्च न्यायालयात अपील करता यावे, यासाठी न्यायालयाने ३० दिवसांचा वेळ दिला असला तरी शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. दरम्यान, केरळच्या वायनाडमधील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. शिक्षा सुनावल्यानंतर आता राहुल गांधींना मोठा धक्का बसला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले असून त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेतून सभात्याग केली असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. दरम्यान ते म्हणाले कि, हुकुमशाही व्यवस्थेकडे आपण चाललो आहोत. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय झालाय. हे दुर्दैवी आहे, हा निर्णय लोकशाहीविरोधातला आहे. गेल्या ९ वर्षांत मोदींचे सरकार आपल्या मित्रांसाठी, ललित मोदी, नीरव मोदी, विजय मल्ल्यासाठी किंवा अशा अनेक लोकांसाठी पाठिंबा देण्याचे काम मोदींचे सरकार करत आहे. त्यांच्याविरोधात राहुल गांधी आवाज उठवत आहेत. त्यांना लोकसभेत बोलू दिले जात नाही. खोटी तक्रार गुजरातमध्ये टाकून जिल्हा न्यायालयाकडून निर्णय घेऊन राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. या घटनेचा विरोध करण्यासाठी आम्ही सभात्याग करत आहे.

दरम्यान अजित पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराची खासदारकी रद्द केली गेली. वैचारिक मतभेद असू शकतात. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत कुणाची खासदारकी रद्द केल्याचे मलातरी काही आठवत नाही. हे संविधानात बसत नाही. प्रत्येकाला आपापले मत मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. पण तरी आज ज्या प्रकारचा निर्णय लोकसभेने घेतला, तो आपल्या लोकशाहीला धक्का देणारा आहे.इंदिराजींच्या बाबतीतही असेच त्या वेळचे सरकार थोदे वेगळ्या पद्धतीने वागले. ज्या इंदिरा गांधींना १९७७ साली आणीबाणीच्या निमित्ताने पराभूत केले होते, त्याच इंदिरा गांधींना १९८० साली पुन्हा सत्तेत बसवण्याचे काम लोकशाहीने केले. त्यामुळे आत्ताच्या घटना सामान्य माणसांना पटणाऱ्या नाहीत. असे हि अजित पवार म्हणाले.

 

AurangabadNewsUpdate : पोलिसांचे आदेश झुगारून निघाला हिंदू जनगर्जना मोर्चा, घोषणांनी दणाणले शहर , प्राक्षोभक भाषणांनी मोर्चाची सांगता….

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

आपलं सरकार

Click to listen highlighted text!