PMNarendraModiNewsUpdate : राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे उत्तर …
हुबळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (12 मार्च) कर्नाटकातील हुबली-धारवाडमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानंतर त्यांनी जाहीर सभेलाही संबोधित केले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी लंडनमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांचे नाव न घेता उत्तर देण्याचा प्रयत्न कताना, काही लोक सतत भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याची टीका केली.
पंतप्रधान म्हणाले की , “भारत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची जननी आहे. लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे दुर्दैवी आहे. काही लोक भारताच्या लोकशाहीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ते म्हणाले की, भारत ही केवळ सर्वात मोठी लोकशाही नाही तर लोकशाहीची जननीही आहे. काही वर्षांपूर्वी मला लंडनमध्ये भगवान बसवेश्वरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे, पण लंडनमध्येच भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह लावण्याचे काम झाले हे दुर्दैव आहे.
‘पृथ्वीवरील कोणतीही शक्ती नुकसान करू शकत नाही’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या लोकशाहीची मुळे आपल्या शतकानुशतके जुन्या इतिहासाने कोरलेली आहेत. जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाही परंपरांना हानी पोहोचवू शकत नाही. ते म्हणाले की, भाजपचे डबल इंजिन सरकार कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक गावाचा आणि प्रत्येक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आज या धारवाडच्या भूमीवर विकासाचा एक नवा प्रवाह येत आहे, जो हुबळी-धारवाडसह संपूर्ण कर्नाटकाच्या भविष्यात सिंचनाचे काम करेल.
कर्नाटकातील भाजप सरकारचे कौतुक
सरकारचे यश मोजताना ते म्हणाले की, २०१४ पर्यंत अनेकांकडे पक्के घर नव्हते. शौचालये आणि रुग्णालयांची कमतरता होती आणि उपचार महाग होते. आम्ही प्रत्येक समस्येवर काम केले, लोकांचे जीवन सुखकर केले. ते म्हणाले की आम्ही एम्सची संख्या तीन पट वाढवली आहे. सात दशकात देशात केवळ 380 वैद्यकीय महाविद्यालये होती, तर गेल्या 9 वर्षांत 250 नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कर्नाटकने आज कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत आणखी एक टप्पा गाठला आहे. आता सिद्धरुधा स्वामीजी स्टेशनला जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे. हा त्या विचाराचा विस्तार आहे ज्यामध्ये आपण पायाभूत सुविधांना प्राधान्य देतो.