Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 : शिक्षण बंदीचा व जात बळकटीकरणाचा जाहिरनामा : शिक्षणतज्ज्ञ रमेश बिजेकर

Spread the love

छत्रपती संभाजीनगर   : भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या समारोप सत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना शिक्षणातज्ज्ञ रमेश बिजेकर म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 शोषित जातवर्गाच्या शिक्षणबंदीचा व जात बळकटीचा जाहीरनामा आहे. या प्रसंगीं ओबीसी नेत्या सुशीलताई मोराळे, डॉ. प्रभाकर गायकवाड, सविताताई हजारे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, एस जी माचनवर, डॉ कालिदास भांगे, प्रा सुदाम चिंचाणे, विलास काळे, प्रबोधनकर अरविंद माळी यांची भाषणे झाली.

पुढे बिजेकर म्हणाले की, समान शिक्षण पद्धती साठी संघटित पणे लढा उभारावा लागेल. विषमतावादी आशय बदलून समतावादी आशयाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. शाळा संकुलाने असंख्य शाळा बंद होतील लाखो विद्यार्थी -विद्यार्थीनींनी शाळाबाह्य होतील तर शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. पुढे ते म्हणाले कोठारी आयोग वगळता कोणत्याही धोरणाने शिक्षणाच्या सार्वत्रिकारणाची भूमिका घेतलेली नाही. म्हणून सर्वाना शिक्षण मिळण्यासोबतच शिक्षण आशय बदलाची चळवळ आपल्याला उभी करावी लागेल.

याप्रसंगी ओबीसी नेत्या सुशीलताई मोराळे म्हणाल्या की ओबीसींनी गाफील न राहता जागृत होऊन संघटितपणे लढा उभारावा लागेल तरच ओबीसींना न्याय मिळेल.

एस जी माचनवर म्हणाले की महापुरुषाच्या विचार प्रत्यक्ष कृतीत आणला पाहिजे तरच ही लढाई पुढे जाईल. आपली जवाबदारी वाढलेली आहे त्यामुळे संघटितपणे संघर्ष करावा लागेल.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ ज्ञानेश्वर गोरे म्हणाले कि सत्यशोधक संस्कृती प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. ओबीसींनी येत्या काळात ओबीसीच्या न्याय्य प्रश्नासाठी काम केले तर ओबीसीसाठी न्याय्य वाटा मिळेल.
याप्रसंगी विविध ठराव पारीत करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने भारतीय बहुजनाच्या शिक्षणाची जिथे सुरुवात झाली व ज्या महापुरुषांनी सुरुवात केली अशा फुले दांपत्याच्या नावावर पुणे शहराला फुलेनगर हे नाव देण्यात यावे. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करून समान शिक्षण पद्धती लागू करण्यात यावी. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. ओबीसींचा शासकीय व निमशासकीय नोकऱ्यातील अनुशेष तात्काळ भरण्यात यावा. शिक्षक- प्राध्यापक भरती केंद्रीय पद्धतीने लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी .अशा अनेक ठराव पास करून यावर रस्त्यावरची व विविध पातळीवरची लढाई लढण्याचे निश्चित झाले .
या ठरावाचे वाचन सुदाम चिंचाणे व डॉ कालिदास भांगे यांनी केले.

सूत्रसंचालन राजू पोपळघट, विलास काळे आभार देवराज दराडे यांनी मानले.डॉ वसंत हारकळ,जनार्दन कापुरे, प्रभाकर गायकवाड, गणेश भुजबळ, आर के निरपणे, विश्वनाथ कोकर ,राजीव पोपळघट ,रमाकांत तिडके, शरद बोरसे ,बालाजी मुंडे ,हनुमान वानकर, रामकिशन मुंडे, अतिश मेहञे अनेक संयोजकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!