जामिया हिंसाचार प्रकरणात शर्जील इमामची निर्दोष मुक्तता

जामिया हिंसाचार प्रकरणात साकेत न्यायालयाने हिंसाचाराशी संबंधित सर्व आरोपातून शर्जील इमामची निर्दोष मुक्तता केली आहे. २०२० मध्ये दिल्लीच्या ईशान्य जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारासाठी शरजीलला अटक करण्यात आली होती. जामिया हिंसाचार प्रकरणासह, त्याच्यावर ईशान्य राज्य आसामसह इतर अनेक राज्यांमध्ये CAA-NRC बाबत लोकांना भडकावल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.
शर्जीलवर आयपीसी कलम १४३, १४७, १४८, १८६, ३५३, ३३२, ३३३, ३०८, ४२७, ४३५, ३२३, ३४१, १२०बी आणि ३४ नुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, या प्रकरणात शरजीलची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र, शर्जील आताच तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाही. कारण २०२० सालच्या दिल्ली दंगलीच्या कटाचा खटला अजूनही इमामविरोधात सुरू आहे. याप्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी शर्जीलवर चिथावणीखोर विधाने केल्याप्रकरणी खटला सुरू आहे, ज्यामध्ये इमामने आसामला भारतापासून वेगळे करण्याचे सांगितले होते, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला होता. या प्रकरणात इमामवर देशद्रोह आणि यूएपीए लावण्यात आले होते, या प्रकरणातही अद्याप जामीन मिळालेला नाही.
१६ जानेवारी २०२० रोजी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शर्जीलने दिलेल्या भाषणासाठी त्याच्यावर पाच राज्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात दिल्ली तसेच अमास, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर यांचा समावेश होता. त्याच्यावर आरोप आहे की त्यानी त्याच्या भाषणात आसामला देशाच्या इतर भागाशी जोडणारा अरुंद भूभाग म्हणजेच चिकन नेक क्षेत्र वेगळे करण्याबाबत वक्तव्य केले. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) शरजीलविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला व त्याला बिहारमधून अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी शर्जीलविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या भाषणांनी केंद्र सरकारबद्दल द्वेष, तिरस्कार आणि नाराजी निर्माण केली होती, ज्यामुळे लोक भडकले आणि त्यानंतर २०१९ डिसेंबर मध्ये जामियामध्ये हिंसाचार झाला.
धक्कादायक… उपचारासाठी जात असताना, रुग्णवाहिकेत वॉर्डबॉयने केला बलात्कार
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055