धक्कादायक… उपचारासाठी जात असताना, रुग्णवाहिकेत वॉर्डबॉयने केला बलात्कार

केरळमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना रुग्णवाहिकेत वॉर्डबॉयने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात येत असताना ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
महिलेने विष घेऊन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने कोडुंगल्लूर रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयात तिच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने तिला त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. कोडुंगल्लूर रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी जात असताना रुग्णालयातील कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या दयालाल ला रुग्णवाहिकेत सोबत येण्यास सांगण्यात आले. दरम्यान, दयालालने रुग्णवाहिकेत महिलेवर बलात्कार केला. त्रिशूल मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल्यानंतर या पीडितेने नर्सला घडलेला प्रसंग सांगितला आणि नंतर डॉक्टरांनाही माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत कोडुंगल्लूर रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक केली.
हे घृणास्पद कृत्य करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. तसेच अटकेसोबतच आरोपी दयालालला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
भूकंपामुळे तुर्की आणि सीरिया हादरले, १,५०० हून अधिक ठार शेकडो लोक जखमी
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055