Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भूकंपामुळे तुर्की आणि सीरिया हादरले, १,५०० हून अधिक ठार शेकडो लोक जखमी

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तुर्कस्तानमधील भूकंपातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये भारत शोध-मदत पथके आणि मदत सामग्री पाठवणार आहे.

सोमवारी पहाटे आग्नेय तुर्की आणि सीरियाला ७.८ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला, ज्यामुळे अनेक इमारती कोसळल्या. भूकंपाशी संबंधित घटनांमध्ये १,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पीएम मोदींनी ट्विटच्या माध्यमातून हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी भूकंपावर केलेले ट्विट टॅग करून पंतप्रधान म्हणाले, भारत तुर्कस्तानच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

भारताचे, NDRF चे दोन पथक, १०० जवानांसह विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणांसह, भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्यासाठी रवाना होण्यासाठी सज्ज आहेत. तसेच अत्यावश्यक औषधांसह प्रशिक्षित डॉक्टर आणि पॅरामेडिक्ससह वैद्यकीय पथकेही तयार आहेत. तुर्की सरकार आणि अंकारा येथील आणि इस्तंबूलमधील वाणिज्य दूतावास कार्यालय, इंडियन एंबेसी यांच्या समन्वयाने मदत साहित्य पाठवण्यात येणार असल्याचे पीएमओने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

हम दो, हमारे दो… मोदीजी अदानीजींवर चर्चा न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!