राज्यातील शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांचे भवितव्य २ फेब्रुवारी पर्यंत मतपेट्यांमध्ये बंद

आज राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघातील पदवीधरांनी आणि शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आज सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडली असून २ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.
कोणत्या विधान परिषदेच्या जागेसाठी किती टक्के मतदान?
मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी एकूण ८६% मतदान झाले आहे. निवडणूकीत औरंगाबादमध्ये ५३, जालन्यात १५, परभणीत १८, हिंगोलीत १२, नांदेडमध्ये ३०, बीडमध्ये ३४, लातूरमध्ये ४०, उस्मानाबादमध्ये २५ अशी एकूण २२७ मतदान केंद्रे होती. या निवडणुकीत एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, ६१ हजार ५२९ मतदारांना मत देण्याचा अधिकार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली असून २ फेब्रुवारीला औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीमध्ये मतमोजणी होणार आहे.
१. उस्मानाबाद ९२%
२. हिंगोली ९१%
३. परभणी ९०%
४. बीड ९०%
५. लातूर ८६%
६. नांदेड ८४%
७. जालना ८२%
८. औरंगाबाद ८०%
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दुपारी दोनपर्यंत एकूण ६०.४८ टक्के मतदान झाले आहे.
१. नागपूर ५२.७५%
२. वर्धा ६७.०६%
३. चंद्रपूर ६९.०६%
४. भंडारा ६३.५८%
५. गोंदिया ५७.१८%
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दुपारी दोनपर्यंत एकूण ३१.७१% मतदान झाले आहे.
१. धुळे ३४.०५%
२. नगर ३२.५५%
३. नंदुरबार ३१.७३%
४. नाशिक २९.९१%
५. जळगाव ३०.९३%
अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अमरावती शहरात दुपारी २ वाजेपर्यंत अमरावती विभागात ३०.४०% मतदान झाले. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी एकूण ६८.४१% मतदान झाले आहे.
बलात्कार प्रकरणी आसाराम बापू दोषी, न्यायालय उद्या सुनावणार शिक्षा
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055