Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बलात्कार प्रकरणी आसाराम बापू दोषी, न्यायालय उद्या सुनावणार शिक्षा

Spread the love

स्वयंघोषित संत आसाराम बापू २०१३ मधील एका बलात्काराच्या प्रकरणाता दोषी आढळला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून उद्या (मंगळवारी) आसाराम बापूला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

भारतात कधीकाळी आसाराम बापू हा मोठा अध्यात्मिक गुरू होता. आसाराम बापूवर २०१३ मध्ये सूरतमधील एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आला असून या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामशिवाय, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा हे देखील आरोपी होते. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी असल्याचे जाहीर केले. मात्र, शिक्षा उद्या, मंगळवारी सुनावणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, सूरत बलात्कार प्रकरणात आसाराम बापूच्या पत्नीसह इतर सहा आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, ही पीडिता शहराबाहेरील एका आश्रमात राहत होती आसाराम बापूने २००१ ते २००६ दरम्यान पीडितेवर अनेकवेळा अत्याचार केला होता.

 

 

धक्कादायक नांदेडमध्ये ऑनर किलिंग; विजेचा शॉक देऊन वैद्यकीय विद्यार्थिनीची हत्त्या


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!