Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MahaTAITExam2023 | शिक्षक भरती परीक्षेची तारीख जाहीर ; उद्यापासून अर्ज सुरु !

Spread the love

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षेच्या तारखा राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. २२ फेब्रुवारी २०२३ ते तीन मार्च २०२३ या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. उमेदवारांना ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

शिक्षक होण्यासाठी आता टीईटीऐवजी आता ‘टेट’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ३५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत राज्यभरातील केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यासाठी अंदाजित तीन ते साडेतीन लाख तरुण-तरुणी परीक्षा देतील, असा अंदाज आहे. येत्या २२ फेब्रुवारी २०२३ ते ३ मार्च २०२३ दरम्यान ऑनलाईन अभियोग्यता चाचणी परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख ८ फेब्रुवारी २०२३ अशी आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यासाठी ‘पवित्र पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे.

 

  • https://www.mscepune.in/#

  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी – ३१ जानेवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२३

  • परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी – ८ फेब्रुवारी २०२३ रात्री ११.५९ पर्यंत

  • प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी- १५ फेब्रुवारीपासून २०२३ पासून

  • ऑनलाईन परीक्षा तारखा – २२ फेब्रुवारीपासून ते ३ मार्चपर्यंत (उमेदवार संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार बदल होण्याची शक्यता आहे.)

  • जाहिरात TAIT EXAM 20220जाहिरात: https://mscepune.in/gcc/TAIT%20EXAM%2020220%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4_2.pdf

  • अधिसूचना : TAIT EXAM 2022 Notificationhttps://mscepune.in/gcc/TAIT%20EXAM%202022%20Notification.pdf

  • इथे भरा अर्ज : https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/

 

 

राज्यातील शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांचे भवितव्य २ फेब्रुवारी पर्यंत मतपेट्यांमध्ये बंद

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!