महराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनच्या पाहिचल्याच दिवशी हल्लाबोल
![](https://www.mahanayakonline.com/wp-content/uploads/2020/09/VidhanBhavan1.jpg)
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद विषयी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाची बाजू स्पष्ट करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. तसेच बोम्मईंचे ते अकाऊंट फेक असल्याचा पुनरुच्चार करताना बोम्मईंच्या ट्विटरवरुन कुणी ट्विट केले आणि कोणत्या पक्षाशी ते संबंधित आहेत, याची माहिती पोलिसांना कळाली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले.
आजपासून नागपुर येथे महराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडी, विरोधी पक्षाने शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. आज अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांनी तितक्याच ताकदीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे हल्ले परतावून लावले.
तसेच सीमाप्रश्नी राजकारण होत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले. सीमावासियांच्या योजनांचा निधी कुणी थांबवला, सत्तेत असताना त्यांच्यासाठी काय केले? आज जे आंदोलनाची भाषा बोलतात, ते त्यावेळी कुठे होते, ज्यावेळी आम्ही लाठ्या काठ्या खात होतो… छगन भुजबळ आंदोलन करण्यासाठी कर्नाटकात पोहोचले, तिथे लाठ्या खाल्ल्या, आम्हीही त्यांच्याबरोबर मार खाल्ला, त्यावेळी आताचे जोरजोरात बोलणारे नेते कुठे होते? असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
#MahaClassifide | “शिक्षक“ पदाच्या एकूण १२४ जागा
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055