Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#BharatJodo १०० दिवस पूर्ण ; आप नसती तर काँग्रेसने भाजपचा पराभव केला असता…

Spread the love

भारत जोडोला १०० दिवस पूर्ण , गुजरातच्या पराभवासाठी राहुल गांधी यांचे आप कडे बोट …

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

गुजरातमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आम आदमी पार्टीकडे बोट दाखवले आहे. गुजरातमध्ये आप नसती तर काँग्रेसने भाजपचा पराभव केला असता असे ते म्हणाले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला शुक्रवारी १०० दिवस पूर्ण झाले, त्यानंतर त्यांनी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.

राहुल गांधी पुढे म्हणाले की ,हिमाचल प्रदेशात भाजपने आपली संपूर्ण संघटनात्मक क्षमता वापरली, पण आम्ही त्यांचा पराभव केला.परंतु गुजरातमध्ये जर ‘आप’ला प्रॉक्सी म्हणून ठेवले नसते आणि काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी त्याचा वापर केला नसता, तर आम्ही तेथेही भाजपचा पराभव केला असता. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने क्लीन स्वीप केला. १८२ पैकी भाजपला १५६ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला १६ आणि आम आदमी पार्टीला ५ जागा मिळाल्या.

भाजप देशात द्वेष पसरवत आहे : राहुल

भाजप देशात द्वेष पसरवत आहे, मात्र बंधुभाव आणि प्रेम कायम राहील, असा दावा राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की भारत जोडो यात्रेने त्यांना देशातील बंधुभावाची आठवण करून दिली, जी अलीकडच्या काळात हरवलेली मानली जात होती. राहुल गांधी म्हणाले की, ज्या दिवशी काँग्रेसला ती कोण आहे आणि ती कशासाठी उभी आहे हे समजेल, त्या दिवशी ती प्रत्येक निवडणूक जिंकेल. आपने २०१७ ची गुजरात निवडणूक देखील लढवली होती, परंतु त्यांच्या सर्व ३९ उमेदवारांचा पराभव झाला होता. भाजप जिंकला. गुजरातमध्ये १९९५ पासून भाजप गुजरातमध्ये सातत्याने विजयी होत आहे, परंतु गेल्या वेळी त्यांची काँग्रेसने भाजपला चुरशीची लढत दिली होती.

 

Telangana : घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील ६ जण जिवंत जाळले


News Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!