Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GujratElectionUpdaate : गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान , दुसऱ्या टप्प्यासाठी मोदींची २७ सभांची तयारी …

Spread the love

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणूक २०२२ चा प्रचार संपला आहे. उद्या गुरुवार १ डिसेंबर रोजी  पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील ५ डिसेंबररोजी होणाऱ्या  मतदानासाठी निवडणूक प्राचाराचे नियोजन करण्यात आले आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे   गृहराज्य  असल्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाजपच्या प्रचाराची मोठी जबाबदारी आहे. या भागात पंतप्रधान १ आणि २ डिसेंबरला गुजरात दौऱ्यावर असतील.


यादरम्यान पंतप्रधान मोदी एकूण ७  जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. १  डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या मध्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचमहालच्या कलोल, छोटा उदयपूरच्या बोडेली आणि हिम्मतनगरमध्ये रॅली करणार आहेत. येथे दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. पीएम मोदींच्या गुरूवारी सकाळी ११ वाजता कलोलमध्ये, दुपारी १२.३० वाजता बोडेली आणि दुपारी २.४५ वाजता हिम्मतनगरमध्ये सभा होणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी गुरुवारी रात्री गांधीनगरमध्ये मुक्काम करतील.

यानंतर २  डिसेंबरला पंतप्रधान मोदी बनासकांठाच्या कनकराज, पाटण, सोजित्रा आणि अहमदाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. कनकराजमध्ये सकाळी ११  वाजता, पाटणमध्ये दुपारी १२.३०  वाजता, सोजित्रामध्ये दुपारी २.४५  वाजता आणि शेवटची सभा अहमदाबादमध्ये सायंकाळी ७  वाजता होणार आहे. गुजरात निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी २० नोव्हेंबरला सोमनाथ मंदिरात जाऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. २  डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये रोड शो आणि रॅलीने भाजपचा प्रचार संपणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पीएम मोदींनी आतापर्यंत २०  रॅली केल्या आहेत. यासोबतच त्यांनी दोन कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. आता  दुसऱ्या फेरीच्या मतदानापूर्वी पीएम मोदींनी गुजरातमध्ये २७  सभांना संबोधित करण्याचे नियोजन केले असून  गेल्या विधानसभा निवडणुकीत पीएम मोदींनी केवळ ३४  सभा घेतल्या होत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!