Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShockingNews । १७ वर्षीय तरुणीवर वडील, काका व आजोबानेच केला विनयभंग

Spread the love

ShockingNews : पुण्यात धानोरी भागात राहणार्‍या १७ वर्षीय तरुणीवर वडील आणि चुलत्याने बलात्कार तर आजोबांनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. वडील अजय रामेश्वर सिंह (वय-४९) चुलता विजय रामेश्वर सिंह (वय-३३) आणि आजोबा रामेश्वर पोलहान सिंह (वय -७०) या तिघांविरोधात विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१६ ते २०१८ दरम्यान १७ वर्षीय पीडित तरुणी उत्तर प्रदेश येथील महुआरकला, चंदोली येथे तिच्या मूळगावी गेली होती. त्यावेळी तिच्यावर चुलता विजय रामेश्वर सिंह याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले तर आजोबा रामेश्वर पोलहान सिंह यांनी तिचा विनयभंग केला. त्यानंतर ती पीडित तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत पुण्यातील धानोरी भागात राहण्यास आली तर वडील अजय रामेश्वर सिंह यांनी देखील तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला.

कुटुंबातील व्यक्तीकडून तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांमुळे ती शांत राहायची. त्याच दरम्यान तिच्या महाविद्यालयात समुपदेशन कार्यक्रमच्या वेळी तिने तेथील व्यक्तीला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन वडील आणि चुलता यांच्यावर बलात्कार तर आजोबा यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यातील आरोपी वडील अजय रामेश्वर सिंह याला अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपींना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश येथे टीम रवाना करण्यात येणार आहे.

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!