Bharat Jodo Yatra | इंदुरमध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी
इंदुरमध्ये राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे एक पत्र मिळाले आहे. या पात्रात राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासणी करण्यास सुरूवात केली आहे.
भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये येण्याआधी इंदुरमध्ये काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे एक पत्र मिळाले आहे. या चिठ्ठीत म्हटले आहे की, भारत जोडो यात्रा इंदुरमध्ये पोहोचल्यावर राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्यात येईल. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम ५०७ नुसार गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धमकी देणारे हे पत्र शुक्रवारी सकाळी एका मिठाईच्या दुकानाबाहेर अज्ञात व्यक्ती सोडून गेली. चिठ्ठी मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे.
Bharat Jodo Yatra route