Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraPoliticalUpdate : शिंदे गटाकडून आयोजित “विचारांचा वारसा” परिसंवादात फडणवीस यांची ठाकरे यांच्यावर टीका …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुंबईत शिंदे गटाकडून ‘वारसा विचारांचा परिसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उभा परिसंवादात बोलताना , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो , राहुल गांधी आणि सावरकरांच्या मुद्यावरून शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.


यावेळी बोलताना , “बाळासाहेब ठाकरेंना स्वांतत्रवीर सावरकरांचा अभिमान होता. त्यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांबद्दल कोणी चुकीचे  बोलले, तर त्याला जशास तसे  उत्तर मिळत होते . मात्र, ज्या सावरकरांबद्दल राहुल गांधी इतके  नीच बोलतात, त्यांच्या गळ्यात गळा टाकून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात, याचे वाईट वाटते “, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

Advertisements

मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की , “बाळासाहेबांशी नाते  हे रक्ताने होत नाही. ते विचाराने असावे  लागते . विचारांचे नाते  हे बाळासाहेबांशी खरे  नाते  आहे. जो विचाराचे  नाते  सांगेन तोच बाळासाहेबांचा खरा अनुयायी असेल, त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली आहे. रक्ताने एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कोणी नसतील, पण विचाराने एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसा चालवत आहेत”, असेही ते म्हणाले.

Advertisements
Advertisements

फडणवीस आपल्या भाषणात ठरेना उद्धेशून पुढे म्हणाले की,  तुमचे-आमचे मतभेद झाले असतील, मान्य आहे. तुम्ही आम्हाला सोडा, आम्हाला शिव्या द्या. मात्र, सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करत असाल, तर बाळासाहेबांशी नाते सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!