CongressNewsUpdate : मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वीकारले काँग्रेसचे अध्यक्षपद…

नवी दिल्ली : काँग्रेसचे नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. २४ वर्षांनंतर काँग्रेसला पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
CongressNewsUpdate : मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वकारल्यानंतर येत्या दोन वर्षात त्यांच्यासमोर १९ राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठे आव्हान असणार आहे. त्यात राजस्थानचाही समावेश आहे, जिथे सध्या काँग्रेसचे सरकार आहे. हे सरकार वाचवण्याचे आव्हानही खरगे यांच्या खांद्यावर असणार आहे. यासोबतच खरगे यांचे गृहराज्य कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांसाठी ही निवडणूक लिटमस टेस्टपेक्षा कमी नसेल. या निवडणुकांमधून खरगे यांच्या कामगिरीचे मूल्यमापन होणार आहे. यातून त्यांची पक्षात आणि पक्षाबाहेरील क्षमता तपासली जाईल.
Congratulated our new Congress President, Shri Mallikarjun Kharge ji and wished him the very best as he takes on this huge responsibility towards the Congress party and the people of India. pic.twitter.com/anzPqnkXbu
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 26, 2022
CongressNewsUpdate
दरम्यान काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच खरगे यांनी आपल्या रणनीतीवर काम सुरू केले आहे. यात खरगे यांना यश आल्यास काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. त्यांच्या निवडीवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे की, आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत आणि आता पुढे जात आहोत, आमचे नेते राहुल गांधी यांच्यासोबतच पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही काँग्रेसला नवे रूप देणार आहेत. ‘राहुल गांधींची भारत जोडो यात्रा खूप यशस्वी आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसला ज्या प्रकारे लोकांचे प्रेम मिळत आहे, त्यावरून आगामी काळात काँग्रेसची कामगिरी चांगलीच नाही, तर यशही मिळेल, हे स्पष्ट होते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment
#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide