Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ‘हनी ट्रॅप’ला बळी पडून लिंगायत साधूची आत्महत्या…

Spread the love

रामनगर : कर्नाटकात सोमवारी एका ४५ वर्षीय लिंगायत साधूने ‘हनी ट्रॅप’ला बळी पडून आत्महत्या केली असल्याचे वृत्त आहे. एका महिलेने त्याच्यासोबत ‘अश्लील व्हिडिओ कॉल’ केले होते आणि त्यांना  ब्लॅकमेल केले जात होते. तपस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार , सुसाइड नोटमध्ये मठाशी संबंधित दोन नावे आहेत.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या फोनच्या स्क्रीन-रेकॉर्डिंग फंक्शनचा वापर करून साधूसोबतचे खासगी क्षण रेकॉर्ड केले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “एका अज्ञात महिलेने माझ्यासोबत हे सर्व केले आहे.”

एका तपास अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “महिला आणि इतर काही जणांनी साधूला चार अश्लील व्हिडीओ जारी करू अशी धमकी दिली. हे लोक कोण आहेत याची माहिती आमच्याकडे आहे.”

लिंगायत पंथाचे महंत बसवलिंग स्वामी हे सोमवारी कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील कंतुगल मठात त्यांच्या खोलीच्या खिडकीच्या ग्रीलला लटकलेले आढळले. महंत बसवलिंग स्वामी हे कांतुगल मठाचे प्रमुख महंत होते. त्यांच्या मृत्यूनंतर दोन पानांची सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, काही लोक आपल्याला त्रास देत होते.

त्रास देणाऱ्यांना महंतांना त्यांच्या पदावरून हटवायचे होते. बसवलिंग स्वामी हे गेल्या २५ वर्षांपासून कांतुगल मठाचे प्रमुख महंत होते. याप्रकरणी कुडूर पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लिंगायत संप्रदाय कर्नाटकात खूप प्रभावशाली मानला जातो. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील याच पंथाचे आहेत. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा हे देखील याच पंथाचे आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!