Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NagpurNewsUpdate : नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारो बौद्ध अनुयायांची गर्दी …

Spread the love

नागपूर : डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला केलेल्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे सामोरं म्हणून अशोक विजयादशमी बरोबरच १४ ऑक्टोबर या दिवशीही नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्धम शरणम् गच्छामि… च्या जयघोषात बौद्ध अनुयायांनी धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने शुक्रवारी हजारो अनुयायांनी  डॉ. बाबासाहेब व तथागत भगवान बुद्ध यांना अभिवादन केले. या सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने लोक दीक्षाभूमीवर आले आहेत.


यावेळी   विविध सामाजिक संघटना व नागपूर शहरातील विविध वस्त्यातील नागरिकांनी  रॅली काढून बुद्धम शरणम् गच्छामि, धम्मम् शरणम् गच्छामि…, भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात बाबासाहेब व तथागतांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले.

या निमित्ताने महिला मंडळाच्या सदस्यांचा समावेश यामध्ये मोठ्याप्रमाणावर होता. बहुतेक उपासक पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन अभिवादनासाठी पोहोचले होते . याअंतर्गत दीक्षाभूमी परिसरात पुस्तकांचे, गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे आणि पुस्तकांचे स्टॉल सजले होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समता सैनिक दलाच्यावतीने शुक्रवारी सकाळी मार्च काढून मानवंदनाही देण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!