UddhavThackerayNewsUpdate : सोनिया गांधी यांचा उद्धव ठाकरे यांना फोन …

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघातील काँग्रेस नेतृत्वाने अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याचीही माहिती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
UddhavThackerayNewsUpdate : थोरात पुढे म्हणाले कि , “महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंना पाठिंबा द्यायचा असा निर्णय सोनिया गांधींनी घेतला असून शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत.” तसेच या पोटनिवडणुकीला आम्ही एकत्र सामोरे जाणार आहोत, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. दरम्यान काँग्रेसने या निवडणुकीसाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल उद्धव यांनी सोनिया गांधींचे आभारही मानले आहेत.
दरम्यान राज्यात ज्यापद्धतीने मागील काही महिन्यांमध्ये राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्याचा संदर्भ देत थोरात यांनी म्हटले आहे कि , “मला खात्री आहे एकत्रितपणे भाजपाचं राजकारण पाहिलं तर ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र ताब्यात घेतला आहे त्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे. या नाराजीचा परिणाम या निवडणुकीमधून समोर येईल.”
येत्या ३ नोव्हेंबर रोजी शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटिनवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या शिवसेनेची कसोटी लागणार आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालाचे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर पडसाद उमटू शकतात. यामुळेच ही पोटनिवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
UddhavThackerayNewsUpdate
#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment
#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide