Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

OnlineMediaNewsUpdate : पॉर्न साईट्सला केंद्राचा पुन्हा दणका , ६७ अश्लील वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे आदेश…

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इंटरनेट कंपन्यांना ६७ अश्लील वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर, २०२१ मध्ये जारी केलेल्या नवीन आयटी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.


OnlineMediaNewsUpdate: दूरसंचार विभागाने पुणे न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे इंटरनेट सेवा प्रदात्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये ६३ वेबसाईट्स ब्लॉक करण्यास सुचवण्यात आले आहे, तर उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे आणखी चार वेबसाईट्स ब्लॉक करण्यास सांगितले आहे. संपूर्ण किंवा आंशिक नग्नता दर्शवणाऱ्या, लैंगिक कृत्य दाखवणाऱ्या तसंच मॉर्फ केलेले फोटो किंवा व्हिडिओ असलेली सामुग्री इंटरनेटवरुन हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दूरसंचार विभागाच्या २४ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, २०२१ च्या नियम ३(२)(ब) नुसार उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलांशी संबंधित अश्लील सामग्री संबंधित वेबसाइट्स/यूआरएलवरून तत्काळ काढून टाकण्याचे (ब्लॉक) करण्याचे निर्देश देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

OnlineMediaNewsUpdate


#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

 

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

For current updates join

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide

https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

आपलं सरकार

Click to listen highlighted text!