Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPakCricket : रविवारच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधीच भारताला धक्का …

Spread the love

नवी दिल्ली : आशिया कप २०२२ मध्ये सुपर-४ सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध सामना होणार असताना भारताला हा धक्का बसला आहे.


बीसीसीआयने शुक्रवारी रवींद्र जडेजाबाबत एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. रवींद्र जडेजाने आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये भाग घेतला होता, त्यामुळे आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला प्लेईंग-११ मध्ये बदल करावा लागणार आहे.

आशिया कप २०२२ मध्ये रवींद्र जडेजा
• वि पाकिस्तान – ३५ धावा, ११/०
• वि. हाँगकाँग – १५/१

रोहित शर्मा कोणाला संधी देणार?

अष्टपैलू रवींद्र जडेजाची जागा घेण्याचा प्रयत्न करणारा कोणताही खेळाडू केवळ अष्टपैलू होऊ शकतो. कारण जडेजा आऊट झाला तर बॅटिंगचा पर्याय कमी आहे, त्याचप्रमाणे तो दोन-चार ओव्हर टाकू शकतो. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यासमोर हे सर्वात मोठे टेन्शन आहे.


त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी मिळेल का, जो काही षटके टाकू शकतो तसेच फलंदाजी करू शकतो? अन्यथा अक्षर पटेलला प्लेइंग-११ मध्ये थेट प्रवेश दिला जाऊ शकतो. कारण तो डाव्या हाताचा फलंदाज आणि फिरकी गोलंदाज आहे, तसेच तो वेगवान फलंदाजीही करू शकतो. अक्षरला यूएईमध्ये आयपीएल खेळण्याचाही अनुभव आहे.

ऋषभ पंतला संधी मिळेल का?

हाँगकाँगविरुद्ध, भारताने हार्दिक पांड्याला विश्रांती दिली आणि ऋषभ पंतला प्लेइंग-११ मध्ये प्रवेश दिला. पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पंड्याचे पुनरागमन निश्चित, अशा परिस्थितीत रवींद्र जडेजाच्या जागी ऋषभ पंतला ठेवणार का? जेणेकरून फलंदाजीचा एक पर्याय वाढवता येईल, अशा परिस्थितीत सर्व २० षटके तीन वेगवान गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज आणि एक अष्टपैलू गोलंदाजांनी टाकावी लागतील.

असा असू शकतो भारतीय संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, आवेश खान

आपलं सरकार

Click to listen highlighted text!