Hingoli News Update : हिंगोलीत २०४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, २४ जणांच्या स्थानबद्धतेचे प्रस्ताव : पोलिस अधीक्षक राकेश कलासागर

हिंगोली / प्रभाकर नागरे : हिंगोली मध्ये गणेश उत्सवाची जयत तयारीरी सुरू आहे दोन वर्षाच्या कोरोना काळाच्या लॉकडाऊन नंतर हिंगोली शहरा सह इतर शहरांमध्येही गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू आहे.
जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २०४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून २४ जणांच्या स्थानबध्दतेचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी मंगळवारी दिली.
हिंगोली जिल्ह्यात गणेशमूर्ती स्थापनेसाठी ९६० गणेश मंडळांकडून ऑनलाईन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५९६ गणेश मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्यात आली आहे. उर्वरीत गणेश मंडळांना परवानगी देण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांकडून जागेची पाहणी व इतर बाबींची तपासणी करूनच अर्ज मंजूर केले जात आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यामध्ये सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, उपाधिक्षक किशोर कांबळे यांच्या सोबतच ९७ पोलिस अधिकारी, ७४९ कर्मचारी, राज्य राखीव दलाची एक कंपनी, दोन आरसीपी, ६०० गृहरक्षक दलाचे जवान तैनात असणार आहे. या शिवाय पोलिस महासंचालक कार्यालयाकडून १ अतिरिक्त पोलिस उपाधिक्षक, १५ पोलिस अधिकारी, १०० कर्मचारी राज्य राखीव दलाची एक कंपनी व ६०० गृहरक्षक दलाचे जवान उपलब्ध करण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात सराईत गुन्हेगार व इतर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये आता पर्यंत २०४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून सदर मोहिम अद्यापही सुरू आहे. या शिवाय २४ जणांच्या स्थानबध्दतेचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्यांवर कडक करवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.